मुंबई महापालिकेत Shiv Sena UBT ला मोठा हादरा; नगरसेवकाची खुर्ची धोक्यात आल्याने गणिते बदलणार

100
मुंबई महापालिकेत 'मोठा राजकीय भूकंप' अटळ? Shiv Sena UBT चे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात!
  • प्रतिनिधी

Shiv Sena UBT            ​एकीकडे ‘ऑपरेशन टायगर’मुळे शिवसेना उबाठाच्या ६ खासदारांनी बंड केल्याने राजकीय भूकंप झाला असतानाच, आता मुंबई महानगरपालिकेतून शिवसेना उबाठासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भांडुपमधील प्रभाग क्रमांक १११ चे नगरसेवक दीपक सावंत यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असून, त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबतचा निर्णय शिवसेना उबाठासाठी मोठा फटका ठरणार आहे. (Shiv Sena UBT)

​दीपक सावंत हे कुणबी आरक्षित जागेवरून निवडून आले होते. मात्र, जात पडताळणी समितीने त्यांचा दावा फेटाळून लावल्यामुळे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. या कायदेशीर पेचामुळे त्यांच्या नगरसेवकपदावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यास, मुंबई महापालिकेतील शिवसेना उबाठाची एकूण नगरसेवकांची संख्या ६५ वरून ६४ वर खाली येणार आहे. (Shiv Sena UBT)

(हेही वाचा – मालमत्ता करात सवलतीसाठी मोबाईल-ईमेल लिंक बंधनकारक; KDMC ची कल्याण-डोंबिवलीकर करदात्यांना सूचना)

​या अपात्रतेमुळे पालिकेतील राजकीय समीकरणांवरही थेट परिणाम होणार आहे. महापालिकेच्या विविध समित्यांमध्ये पक्षांच्या संख्याबळाच्या आधारावर जागांचे वाटप होत असते. त्यामुळे एक जागा कमी झाल्याने स्थायी समिती आणि प्रभाग समित्यांमधील शिवसेना उबाठाचे प्रतिनिधित्व प्रभावित होऊ शकते. आगामी काळात या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता असली, तरी तोपर्यंत पालिकेतील सत्तेचे गणित बदलून महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Shiv Sena UBT)

​देशातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत, जिथे अनेक दशके शिवसेनेची एकहाती सत्ता होती, तिथे या पराभवानंतर आता संख्याबळ कमी होणे हे शिवसेना उबाठासाठी चिंतेची बाब ठरत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपा ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे, तर शिवसेना उबाठा ६५, शिवसेना २९ आणि इतर पक्ष या स्थितीत आहेत. दीपक सावंत यांच्या अपात्रतेनंतर हे संख्याबळ पुन्हा एकदा चर्चेत आले असून, मुंबईच्या राजकारणातील हा बदल शिवसेना उबाठाची कोंडी करणारा ठरणार आहे. (Shiv Sena UBT)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.