Maharashtra Transgender Policy 2024 : राज्य सरकारचे तृतीय पंथीयांसाठी धोरण; कोणकोणते मिळणार फायदे?

ट्रान्सजेंडर्स-तृतीयपंथीय व्यक्तीला लिंगबदल शस्त्रक्रिया करायची आहे, त्या व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाऊ शकते किंवा शासकीय रुग्णालयात मोफत लिंगबदल शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

215
राज्य सरकारने तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसेच रोजगार, स्वंयरोजगारासाठी अशा व्यक्तींचे वैयक्तिक आणि सामुहिक प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांना समान संधी, समानता, सन्मानाने जगणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सर्व क्षेत्रांत त्यांच्याशी भेदभाव न करणे, आरोग्य, शिक्षण व रोजगारांच्या संबंधात कल्याणकारी योजना लागू करण्यासाठी नवीन धोरण जाहीर (Maharashtra Transgender Policy  2024)  करण्यात आले आहे. या धोरणात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात तृतीयपंथीयांची लोकसंख्या साधारणतः ४० हजार ८९१ इतकी आहे

Maharashtra Transgender Policy  2024  नुसार कोणकोणते मिळणार फायदे? 

  • पदवी, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या ट्रान्सजेंडर्स-तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याबरोबरच शिष्यवृत्ती आणि मोफत शिक्षणाची तरतूद
  • नागरी सेवा परीक्षांमध्ये अर्ज करणाऱ्या ट्रान्सजेंडर्स समुदायातील व्यक्तींसाठी ओळख श्रेणी म्हणून तृतीय लिंग पर्याय उपलब्ध
  • कामाच्या ठिकाणी कोणत्याही हिंसाचार किंवा छळापासून ट्रान्सजेंडर व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी तक्रार निवारण नवीन कक्ष स्थापन केला जाणार. या कक्षात किमान एका ट्रान्सजेंडर व्यक्तीचा समावेश असणार.
  • ट्रान्सजेंडर व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सवलतीच्या व्याज दरात कर्ज दिले जाणार आहे.
  • ट्रान्सजेंडर व्यक्तींना बचत गट तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासन मदत करेल.

(हेही वाचा Coastal Road मुळे ४० टक्के वाहतूक कोंडी सुटली; कोणत्या भागातील वाहन चालकांना मिळाला दिलासा?)

शासकीय रुग्णालयात लिंगबदल शस्त्रक्रिया मोफत

ट्रान्सजेंडर्स-तृतीयपंथी यांना मदत करण्यासाठी जिल्हा स्तरावर वैद्यकीय मंडळे स्थापन करण्यात येणार असून प्रत्येक जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी सल्लामसलत, उपचार, समुपदेशन यासाठी आवश्यक तरतुदी केल्या जाणार आहे. तसेच ज्या ट्रान्सजेंडर्स-तृतीयपंथीय व्यक्तीला लिंगबदल शस्त्रक्रिया करायची आहे, त्या व्यक्तीला अर्थसहाय्य दिले जाऊ शकते किंवा शासकीय रुग्णालयात मोफत लिंगबदल शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.