Child Marriage : राज्यात मागील तीन वर्षांत दोन हजार २८७ बालविवाह रोखण्यात यश

पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर अशा तालुक्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याची स्थिती आहे.

202
बालविवाह रोखण्यात यश
बालविवाह रोखण्यात यश

राज्यात मागील तीन वर्षांत दोन हजार २८७ बालविवाह Child Marriage रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश मिळाले. राज्यात सर्वत्र ही प्रथा डोके वर काढत आहे, पण सोलापूर जिल्ह्यातील बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत एप्रिल २०२० ते एप्रिल २०२३ या काळात तब्बल सर्वाधिक २२० बालविवाह रोखले आहेत.

पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर अशा तालुक्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याची स्थिती आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा संपली आहे. त्यानंतर मुलगी शिकून कोठे नोकरी लागणार आहे, सोशल मिडियातून अनेकजण बिघडत आहेत, मुली-महिला पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. कौटुंबिक परिस्थिती देखील अडचणीची आहे, चांगला पती मिळतोय तर लवकरच मुलीचे हात पिवळे करू म्हणून अनेक पालक मुलीचे वय १८ होण्यापूर्वीच Child Marriage विवाह लावून देत आहेत.

(हेही वाचा BJP : भाजपनेही भाकरी फिरवली; नव्या कार्यकारिणीत कोणाला मिळाली संधी?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.