Vehicle : दुचाकी, चारचाकी ‘स्पेअर पार्टस्’च्या किंमती तीस टक्क्यांनी महागल्या

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी सर्व सुट्या भागांच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे.

126
दुचाकी अन चारचाकी 'स्पेअर पार्टस्' च्या किंमती तीस टक्क्यांनी महागल्या
दुचाकी अन चारचाकी 'स्पेअर पार्टस्' च्या किंमती तीस टक्क्यांनी महागल्या

वाहनांचे Vehicle बहुतांश सुटे भाग लोखंड, स्टीलपासून तयार होतात दोन्हीच्या किमती वर्षभरात ४० रुपयांवरून ६५ रुपयांवर गेल्या आहेत. तसेच इंधन दरवाढ, वाहतुकीचा खर्च, लेबर कॉस्ट या सर्वच घटकांच्या किमती वाढल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या सर्व सुट्या भागांच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कार व दुचाकी वाहनांचे Vehicle सुटे भागाच्या दरात वाढ झाल्याने दुचाकीची ‘रिपेअरिंग’ करणे आवाक्याबाहेर झाले आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. परिणामी Vehicle सर्व सुट्या भागांच्या किमतीवर त्याचा परिणाम झाला आहे. हा खर्च अंतिमत: ग्राहकांवरच पडत आहे. पूर्वी गाडीचे क्लचप्लेट २४० रुपयाला मिळणारी आता तीच ४८० रुपयांना मिळत आहे. दुचाकीच्या इंजिन ऑईलमध्ये ४० ते ५० रुपयांची वाढ झालेली आहे. १७० ते १८० रुपयांत मिळणारे ऑइल २३० ते २५० रुपये प्रतिलीटरवर गेले आहे. दुचाकी वाहनांच्या टायरमध्ये गुणवत्तेनुसार किमती वाढल्या आहेत. स्प्लेंडरचा मागचा टायर पूर्वी १४६० रुपयाचा होता तो आता १७८० रुपये तर ट्यूब मध्ये देखील ५० ते ६० रुपयांची वाढ झाली असल्याची विक्रेत्यांनी सांगितले.

(हेही वाचा Government : सरकार शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.