CM Eknath Shinde : मुख्यमंत्री व नार्वेकरांची ‘वर्षा’वर बंद दाराआड चर्चा, नेमकं काय घडतंय

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडे बोल सुनावल्यानंतर ही भेट घडली असल्याचे बोलले जात आहे.

102
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री व नार्वेकरांची ‘वर्षा’वर बंद दाराआड चर्चा, नेमकं काय घडतंय
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री व नार्वेकरांची ‘वर्षा’वर बंद दाराआड चर्चा, नेमकं काय घडतंय

आमदार अपात्रतेचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यापासून चांगलाच गाजत आहे. त्यातच बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली या भेटीदरम्यान नेमके काय झाले आहेत. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. (CM Eknath Shinde)

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडे बोल सुनावल्यानंतर ही भेट घडली असल्याचे बोलले जात आहे. तर या बैठकीदरम्यान आमदार अपात्रतेबाबत चर्चा झाल्याचे समजते. मात्र मतदारसंघातील कामासंदर्भात ही भेट असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी पार पडत आहे. सुप्रीम कोर्टाने नुकतंच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. कोर्टाने राहुल नार्वेकर यांना अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी तातडीने वेळापत्रक जाहीर करावं. नाहीतर आम्ही वेळापत्रक जाहीर करु, असं कोर्टाने स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

(हेही वाचा : Supriya Sule : भाजपमध्ये महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते; सुप्रिया सुळे यांनी का केला आरोप ?)

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण मुंबई मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यासाठी नार्वेकर यांनी मतदारसंघातील कामात लक्ष घालण्यासही सुरुवात केली आहे.आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी नवरात्रीच्या सुटीच्या काळात वेळापत्रकाबाबत विधानसभा अध्यक्षांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता सुनावणीचे नवीन वेळापत्रक नार्वेकर यांना तयार करावे लागणार आहे. हे वेळापत्रक न्यायालयात सादर झाल्यानंतर आमदार आपत्रतेबाबतचा निर्णयही लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्षांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.