Maharashtra Political crisis : ‘मविआ’ मधील काही आमदार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात – उदय सामंत

निकालानंतर (Maharashtra Political crisis) भरपूर घडामोडी घडतील.

126
Maharashtra Political crisis : 'मविआ' मधील काही आमदार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात - उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा (Maharashtra Political crisis) सत्तासंघर्ष सुरु झाला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या सत्ता संघर्षाचा गुरुवार ११ मे रोजी अंतिम निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार राहणार की पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे. (Maharashtra Political crisis)

अशातच राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदे गटातील आमदार उदय सामंत (Uday Samant) यांनी एक मोठं विधान केलं आहे. ‘महाविकास आघाडी पक्षातील काही आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत.’ असं विधान उदय सामंत (Uday Samant) यांनी केलं केलं आहे. त्याचसोबत उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटवर टीका केली आहे. (Maharashtra Political crisis)

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

“निकालानंतर (Maharashtra Political crisis) भरपूर घडामोडी घडतील. उद्धव ठाकरे गटातील काही आमदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातले काही आमदार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. याची प्रचिती तुम्हाला येत्या एक-दोन महिन्यांत येईल”, असा मोठा दावा उदय सामंत (Uday Samant) यांनी कला आहे.

संजय राऊत यांना गांभीर्याने घेत नाही

तसेच सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरून उदय सामंत यांनी (Uday Samant) टोला लगावला आहे. “संजय राऊत हे नवकवी झाले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याव्यतिरिक्तही महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यांची टेप रोज सकाळी साडेनऊ वाजता वाजत असते. त्याला प्रत्येकवेळी उत्तर दिलंच पाहिजे असं काही नाही. शिल्लक असणारे आमदार-खासदार सांभाळण्यासाठी कोणत्यातरी नेत्यानं बोललं पाहिजे. म्हणून ते रोज सकाळी बोलत असतात. त्यांना कुणीही गांभीर्याने घेत नाहीत.”

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.