BMC : महापालिकेत सनदी अधिकाऱ्यांचे होते खच्चीकरण

हर्डीकर यांच्याकडील पदभार अतिरिक्त आयुक्त ऐवजी सहआयुक्त यांच्याकडे

188
BMC : महापालिकेच्या जल अभियंता पदी चंद्रकांत मेतकर तर पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या प्रमुख अभियंता पदी राजू जहागीरदार
सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेचे (BMC) आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी आता सर्व मर्यादाच ओलांडत आजवरच्या सर्व प्रथा आणि परंपरा पायदळी तुडवण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या (BMC) अतिरिक्त आयुक्तांकडील पदभार त्यांच्या रजेच्या काळात अन्य अतिरिक्त आयुक्त किंवा सनदी अधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांकडे सोपवला जातो. परंतु महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नव्याने नियुक्त झालेल्या श्रावण हर्डीकर हे मसुरीला पुढील एक महिन्यांकरता प्रशिक्षण करता गेल्याने त्यांच्याकडील पदभार अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे), अतिरिक्त आयुक्त (शहर) आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांच्याकडे विभागून देण्याऐवजी चक्क सहआयुक्त (सुधार) यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) पदाचा कार्यभार सोपवला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात अतिरिक्त आयुक्तांकडील पदभार बिगर सनदी अधिकारी असलेल्या सहआयुक्त यांच्याकडे सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे चहल यांचा सनदी अधिकाऱ्यांवर विश्वास नाही की महापालिकेतील सनदी अधिकारी यांचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे,असा सवाल उपस्थित होत आहे

(हेही वाचा – मे महिन्यात मुंबई भूषवणार तीन जी-20 बैठकांचे यजमानपद)

अतिरिक्त महानगरपालिका (BMC) आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्रावण हर्डीकर हे Mid-Career Training (Phase-IV), मसुरी येथे ०८.मे २०२३ ते दि.०२.जून.२०२३ या कालावधीत प्रशिक्षणाकरिता गेले आहेत. त्यामुळे या कालावधीत त्यांच्याकडील ‘अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे)’ ह्या पदाचा कार्यभार सह आयुक्त (सुधार) रमेश पवार, ह्यांच्याकडे, अतिरिक्त कामकाज म्हणून सोपविण्यात येत आहे. श्री. श्रावण हर्डीकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) हे प्रशिक्षण कार्यक्रम कालावधीनंतर कार्यालयात उपस्थित झाल्यावर त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली कामे खाती ते पूर्वीप्रमाणेच सांभाळतील असे महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने काढलेल्या कार्यलयीन आदेशात म्हटले आहे.

मुंबई महापालिकेत (BMC) तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांची बदली झाल्यानंतर त्या जागी जयश्री भोज यांची नियुक्ती झाली होती. परंतु त्यावेळी सिंघल यांचेकडील खात्यांचा पदभार भोज यांना न देता तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनी या खात्याच्या कारभार तत्कालीन सहआयुक्त (विशेष) आशुतोष सलील यांच्याकडे सोपवून, त्या माध्यमातून स्वतः कडे या खात्यांचा कारभार ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण पुढे सलील हे मसुरीला प्रशिक्षण करता गेल्याने या महत्वाच्या खात्यांचा कारभार अतिरिक्त आयुक्त अतिथी पी. वेलरासु यांच्याकडे सोपवण्यात आला होता आणि तेव्हापासून या विभागांचा कारभार त्यांच्याकडेच राहिला.

हेही पहा – 

त्यामुळे सहआयुक्त रमेश पवार यांच्याकडे या पदाचा कारभार सोपवला असला तरी भविष्यात हर्डीकर पुन्हा सेवेत परतल्यानंतर यातील काही खात्यांचा कारभार पवार यांच्याकडे ठेवला तर जाणार नाही ना? वेलरासु यांच्याकडे काही खात्यांचा कारभार सोपवण्यासाठी जी शक्कल लढवली होती, त्याचाच हा भाग नाही ना असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेत (BMC) आश्विनी भिडे, आशिष शर्मा, पी वेलरासु हे तीन अतिरिक्त आयुक्त आहे आहेत आणि चौथे सनदी अधिकारी असलेले अजित कुंभार हे सह आयुक्त आहेत. त्यामुळे भोज यांचेकडील महत्वाची खाती जेव्हा सनदी अधिकारी असलेल्या सह आयुक्त आशुतोष सलील यांच्याकडे सोपविण्यात आले होते, त्याप्रमाणे अतिरिक्त आयुक्त ( पश्चिम उपनगरे) यांच्याकडील पदभार सहआयुक्त अजित कुंभार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभाल म्हणून का सोपवला नाही असा प्रश्न आता महापालिकेच्या अधिकारी वर्गाला आणि लोकप्रतिनिधींना पडलेला आहे.

मुंबई महापालिकेत (BMC) आश्विनी भिडे यांच्याकडे महत्वाची खाती नाही आणि आशीष शर्मा हे सनदी अधिकारी म्हणून ज्येष्ठ असतानाही त्यांच्याकडे शहर भागाची जबाबदारी सोपवली आहे. तर संजीव कुमार यांच्याकडे पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली असली तरी आयुक्तांच्या मानमानी कारभारामुळे ते ही कंटातळे आणि त्यांनी आपली बदली करून घेतली. चहल यांची कार्यपद्धती मान्य नसल्याने शर्मा यांचेही त्यांच्याशी जुळत नाही. याचा फायदा घेत या पदाचा भार रमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे बोलले जाते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.