शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ; चौकशीसाठी एसआयटीची स्थापना

99
शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाचे पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या युवासेना कार्यकारिणीचे सदस्य साईनाथ दुर्गे यांना मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन ताब्यात घेतले. या प्रकरणाचे पडसाद विधीमंडळातही उमटले. भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी या प्रकरणामागच्या मास्टरमाईंडला शोधून काढा, अशी मागणी केली. त्यावर सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापन करण्याची घोषणा केली. मंत्री शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात याबाबतची घोषणा केली.
शीतल म्हात्रे यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. काही बाईकस्वार पाठलाग करत असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आज सकाळी दादर शिवाजी पार्क इथल्या निवासस्थानापासून कार्यालयात जात असताना सिद्धिविनायक मंदिर परिसरात एका बाईकस्वार कारजवळ आला. माझ्या सुरक्षेसाठी पोलिसांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ते पुढे आले. पोलीस पाहाताच बाईकस्वार पसार झाला, असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले. यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांना माहिती दिल्याचेही शीतल म्हात्रे यांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर आरोप केला आहे. ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या साईनाथ दुर्गेला अटक करण्यात आले आहे. यावरुन या गोष्टी कोणत्या थराला गेल्या आहेत, हे कळते, असे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.