Maharashtra BJP In Election Mode : पक्षाने दिलेला ‘टास्क’ पूर्ण करणारा आमदारच परिक्षेत उत्तीर्ण होईल

महाराष्ट्र भाजप ‘इलेक्शन मोड’मध्ये

147
BJP चा आदिवासी समाजावर फोकस
BJP चा आदिवासी समाजावर फोकस
सुजित महामुलकर
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यातील घवघवीत यशानंतर भाजपने (Maharashtra BJP In Election Mode) आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. पक्षाच्या अंतर्गत अभ्यास गटातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पक्षाच्या १०५ बहुतांशी आमदारांची कामगिरी असमाधानकारक असल्याची माहिती उघड झाली आहे.
निगेटिव्ह‘ अहवाल ‘पॉझिटिव्ह’ करण्याची संधी
या अहवालानंतर पक्षाने आमदारांना काही ‘टास्क’ दिला असून 25 जानेवारीपर्यंत आपली कामगिरी विविध ‘टास्क’ पूर्ण करून आपला ‘निगेटिव्ह ‘ असलेला अहवाल ‘पॉझिटिव्ह’ करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, अन्यथा विधानसभेचे तिकीट मिळण्याची चिन्हे धूसर होतील, असा इशाराही दिला आहे. (Maharashtra BJP In Election Mode)

(हेही वाचा-बापू या नावाने ओळखले जाणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रकार Sattiraju Lakshmi Narayana)

आमदारांची कामगिरी असमाधानकारक 
नागपूर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत त्यांच्या कार्यअहवालाचा सखोल आढावा घेण्यात आला. यात बहुतांशी आमदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजना, लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवा. आमदारांनी पक्षाचा ‘अजेंडा’ गांभीर्याने घ्यावा आणि पक्षाची कामे, मोदी यांनी घेतलेले लोकहिताचे निर्णय, केंद्र सरकारच्या लोकहिताच्या योजना ‘नमो’ ॲप 50 हजार कार्यकर्त्यांपर्यंत डाउनलोड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आली आहेत, ही आमदारांच्या कामगिरी सुधारणेसाठी दिलेली शेवटची संधी असेल. ही उद्दिष्टे 25 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी वेळ देण्यात आला असल्याचे (Maharashtra BJP In Election Mode) खात्रीलायक सूत्रांनी हिंदुस्तान पोस्टला सांगितले.
‘नमो’ स्पर्धा आयोजित करा
‘नमो’ क्रीडा सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करा, पक्षाने दिलेला अजेंडा आमदारांनी पूर्णपणे राबवावा, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या. यात ‘नमो’ क्रीडा स्पर्धा जसे क्रिकेट, खो-खो, कबड्डी, बॅडमिंटन अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे, त्याचबरोबर सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नृत्य, संगीत, वाद्य वाजवण्याची स्पर्धा आयोजित करावी. या स्पर्धांची बक्षिसे यांची रक्कम किती असावी, यासंदर्भात पक्षाकडून कळविण्यात येईल.
सर्व घटकांना सोबत घ्या
भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी करत असतानाच आमदारांना आपला जनसंपर्क वाढविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. समाजातील सर्व घटकांना घेऊन पक्षकार्याशी जोडावे अशाही सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आता पक्षाच्या या परीक्षेत किती आमदार उत्तीर्ण होऊन पुढील विधानसभेत प्रवेश करतात हे येणारा काळच ठरवेल.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=28xZ5gmoE6o

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.