अखेर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! आता पुढे काय?

97

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आजच्या कार्यक्रमपत्रिकेच नव्हता. अखेर यंदाच्या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे. आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी  विशेष अधिवेशन घेण्याचा पर्याय सरकारच्या विचारात आहे.

राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्याची चाचपणीही करण्यात आली

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही यावरुन अनेक चर्चा सुरू होत्या. त्याच दरम्यान आता या निवडणुकीच्या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. थोड्याच वेळापूर्वी महाविकास आघाडी सरकारची एक बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतला. हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडी सरकार ठाम होते. मात्र, मविआ सरकारने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांकडून अद्याप कुठलाही निर्णय आला नाही. त्यानंतर राज्यपालांच्या अनुमतीशिवाय निवडणूक घेण्याची चाचपणीही करण्यात आली. पण कुठल्याही कायदेशीर पेचात अडकू नये यासाठी राज्य सरकारने आज निवडणूक न घेण्याचे ठरवले आहे.

(हेही वाचा खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला)

विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन?

त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एक विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते किंवा राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही निवड होऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.