“शिवसेना म्हणजे कौरवांमध्ये गेलेला कर्ण”, मुनगंटीवारांची खोचक टीका

80

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापले आहे. राज्यपालांच्या संमतीशिवाय अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस आग्रही नसल्याचे दिसून आले आहे. आता याच पार्श्वभूमीवर बोलताना, सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर निशाणा साधत,  शिवसेना ही कौरवांमध्ये गेलेला कर्ण आहे, अशी खोचक टीका केली आहे, ते विधानभवनाबाहेर माध्यमांशी बोलत होते.

चेहरा लोकशाहीचा आणि हदय हुकूमशाहीचं

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी यासाठी आम्ही वर्षभर आग्रही होतो. पण, सरकार आमच्यावर काय बेईमान होती काय माहिती, पहिल्यांदा त्यांनी नियम समितीचे नियम बदलले, नंतर ज्या सज्जन नेत्यांनी सदविवेकबुद्धीने हे निर्णय घेतले, त्या नेत्यांच्या निर्णायावर प्रश्नचिन्ह उभे केले. जे निलंबित आमदार आहेत, त्यांना या लोकशाही पद्धतीने मतदान करण्याचा हक्क द्यावा यासाठी आम्ही विनंती करत होतो,पण चेहरा लोकशाहीचा आणि हदय हुकूमशाहीचं असं काहीसं या सरकारने  चालवलं आहे, असं सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

आमची एवढीच अपेक्षा आहे

त्या 12 आमदारांना निवडणुकीचा अधिकार आहे. तो त्यांना मिळायला हवा. घटनेनुसार तुम्हाला आमदारांना वगळून निवडणुक घेता येत नाही. आम्ही म्हणतो निवडणूक घ्या,पण लोकशाही मार्गाने घ्या. त्यासाठी आणखी 8 दिवस अधिवेशन वाढवा, आम्ही तुमच्याच बाजूने उभे राहू, पण अध्यक्षपदासाठी तेवढ्याच उंचीचा अध्यक्ष असायला हवा, योग्य अध्यक्षाची जर तुम्ही निवड केली तर, आम्ही आहोतच तुमच्यासोबत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर तर आमचा कोणताच हट्ट नाही. आमचं फक्त एवढच म्हणणं आहे की, या लोकशाहीची, विधानसभेची परंपरा खंडीत न करणारा, जनतेच्या प्रश्नाबाबत गंभीर असणारा, सगळ्यांना न्याय देणारा, अनेकदा निर्देश देऊन, राज्य सरकारला योग्य दिशा दाखवणारा, अध्यक्ष असायला हवा, एवढीच आमची अपेक्षा असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

( हेही वाचा Video: वर्धापन दिनी गालबोट! काँग्रेस झेंडा फडकण्याऐवजी पडला सोनियांच्या हातात…)

तर, पराभवाचा झटका लागणार

12 आमदारांच्या निलंबनाबाबतीत अनेकदा विनंत्या करुनही, सरकार ऐकले नाही, देव त्यांना सद्बुद्धी देवो, कारण शेवटी हट्ट रावणाला मानवणारा नव्हता आणि दुर्योधन आणि दुश:सनाला ही मानवणारा नव्हता. पांडवांना सोडून, दुर्योधन आणि दुश:सनाची सोबत करणा-या कर्णाचा जसा पराभव झाला, तसा पांडवांसोबतचा कर्ण तिकडे गेला असेल, तर त्यांना सुद्धा पराभवाचा झटका लागल्याशिवाय राहणार नाही. कृष्णाचा अंश असणारी जनता पराभव दिल्याशिवाय राहणार नाही. अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.