अजित पवार विधानसभेचे २९ वे विरोधी पक्षनेते

481

शिंदे-भाजप युतीच्या सरकारने सोमवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावात विजय मिळवला. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारच्या सत्तेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. तर अजित पवार यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात आली आहे. अजित पवार हे विधानसभेचे २९वे विरोधी पक्ष नेते ठरले आहेत. आतापर्यंत विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद भूषवणाऱ्यांची संपूर्ण यादी…

स्वातंत्र्यपूर्व मुंबई विधानसभा (1937-47)

1. अली मुहम्मद खान देहलवी (1937 ते 1939)
2. ए. ए. खान (1946 ते 1947)

स्वातंत्र्योत्तर बॉम्बे विधानसभा (1947-60)

2. ए. ए. खान (1947 ते 1952)
3. तुळशीदास जाधव (1952 ते 1955)
4. एस. एम. जोशी (1958 ते 1959)
5. उद्धवराव पाटील (1958 ते 1959)
6. विठ्ठल देविदास देशपांडे (1959 ते 1960)

महाराष्ट्र विधानसभा (1960)

7. रामचंद्र धोंडिबा भंडारे (1960 ते 1962)
8. कृष्णराव धुळप (1962 ते 1972)
9. दिनकर पाटील (7 एप्रिल 1972 ते जुलै1977)
10. गणपतराव देशमुख (18 जुलै 1977 ते फेब्रुवारी 1978)
11. उत्तमराव पाटील (28 मार्च 1978 ते 17 जुलै1978)
12. प्रभा राव (फेब्रुवारी 1979 ते 13 जुलै 1979)
13. प्रतिभा पाटील (16 जुलै 1979 ते फेब्रुवारी 1980)
14. शरद पवार

  • (3 जुलै 1980 ते 1 ऑगस्ट 1981)
  • (15 डिसेंबर 1983 ते 14 जानेवारी 1985)
  • (21 मार्च 1985 ते 14 डिसेंबर 1986)

(हेही वाचा – Maharashtra Assembly session: आतापर्यंत कोणी-कोणी भूषविले विधानसभा अध्यक्षपद, बघा पूर्ण यादी)

15. बबनराव ढाकणे (17 डिसेंबर 1981 ते 14 डिसेंबर 1986)
16. निहाल अहमद (14 डिसेंबर 1986 ते 26 नोव्हेंबर 1987)
17. दत्ता पाटील (27 नोव्हेंबर 1987 ते 22 डिसेंबर 1988)
18. मृणाल गोरे (23 डिसेंबर 1988 ते 19 ऑक्टोबर 1989)
(17.) दत्ता पाटील (20 ऑक्टोबर 1989 ते 3 मार्च 1990)
19. मनोहर जोशी (22 मार्च 1990 ते 12 डिसेंबर 1991)
20. गोपीनाथ मुंडे (12 डिसेंबर 1991 ते 14 मार्च1995)
21.मधुकरराव पिचड (25 मार्च 1995 ते 15 जुलै 1999)
22. नारायण राणे (22 ऑक्टोबर 1999 ते 12 जुलै 2005)
23. रामदास कदम (1 ऑक्टोबर 2005 ते 3 नोव्हेंबर 2009)
24. एकनाथ खडसे (11 नोव्हेंबर 2009 ते 8 नोव्हेंबर 2014)
25. एकनाथ शिंदे (12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014)
26. राधाकृष्ण विखे-पाटील (23 डिसेंबर 2014 ते 5 जून 2019)
27. विजय नामदेवराव वडेट्टीवार (24 जून 2019 ते 9 नोव्हेंबर 2019)
28. देवेंद्र फडणवीस (1 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022)
29. अजित पवार (4 जुलै 2022)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.