कॅबिनेट मंत्रीपद द्या, अन्यथा स्वतंत्र लढू; महादेव जानकरांचा भाजपाला इशारा

220
कॅबिनेट मंत्रीपद द्या, अन्यथा स्वतंत्र लढू; महादेव जानकरांचा भाजपाला इशारा
कॅबिनेट मंत्रीपद द्या, अन्यथा स्वतंत्र लढू; महादेव जानकरांचा भाजपाला इशारा

वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदावर दावा केला आहे. आम्ही भाजपकडे मागणार नाही, पण मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद हवे आहे. भाजपला मित्रपक्षाची गरज आहे, मात्र त्यांनी मित्र पक्षाची वाट लावली. त्यामुळेच आमची स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. आमचे हेलिकॉप्टर जर लॅण्ड झाले, तर आम्ही आमची जागा दाखवून देऊ, असा इशारा जानकर यांनी भाजपाला दिला.

गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपने रासपला एकही जागा दिली नाही, अशी खंत व्यक्त करताना जानकर यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्ही भाजपसोबत असूनही आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करून शेवटी आमचा आमदार निवडून आणला. त्यावेळी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीनेही आम्हाला सोबत घेतले नाही, असेही जानकर म्हणाले.

(हेही वाचा – जालना : पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट, पोलिसांची कारवाई)

पंकजा मुंडे योग्य निर्णय घेतील

भाजप नेत्या पंकजाताई माझी बहीण आहे. त्या एका पक्षाच्या सचिव असून, हुशार आहेत. त्यामुळे बीआरएसबाबत त्या स्वतः योग्य तो निर्णय घेतील. कुठल्याही पक्षाला लोकशाहीत अधिकार असून, याबाबत जनताच ठरवेल. बीआरएस पक्षाचे शेतकरी धोरण चांगले आहे. या पक्षाच्या नेत्यांनी अजून माझ्यासोबत चर्चा केली नसल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.