राहुल गांधी ‘संवेदनाहीन’ आहेत – भाजपचा आरोप

मणिपूरचे वातावरण दौरा करण्यासारखे नसतानाही राहुल गांधी यांचे तेथे जाणे योग्य नाही.

166
राहुल गांधी 'संवेदनाहीन' आहेत - भाजपचा आरोप

वंदना बर्वे

वास्तविक परिस्थितीचे भान न ठेवता मणिपूरच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना भाजपने संवेदनशील होण्याचा सल्ला दिला आहे. मणिपूरचे वातावरण दौरा करण्यासारखे नसतानाही राहुल गांधी यांचे तेथे जाणे योग्य नाही असे भाजपने म्हटले आहे.

केरळच्या वायनाडचे निलंबित खासदार राहुल गांधी यांना मणिपूर दौरा अपूर्ण सोडून रिकाम्या हाताने परत यावे लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलिकडेच सर्वपक्षांच्या नेत्यांशी बैठक करून मणिपूरमधील वातावरण शांत करण्याचे प्रयत्न केले होते.

अशातच, राहुल गांधी यांनी आज (गुरुवार २९ जून) मणिपूरचा दौरा केला. मुळात, मणिपूरचे वातावरण दौरा करण्यासारखे नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. यामुळे स्थानिक प्रशासनाने राहुल गांधी यांना बिष्णुपूरमधूनच परत पाठविले. मुळात, मणिपूरची परिस्थिती माहित असतानाही राहुल गांधी यांनी तेथे जायला नको होते. परंतु, आपली जिद्य पूर्ण करण्यासाठी सर्व गोष्टींकडे कानाडोळा करून ते तेथे गेले. राहुल गांधी यांनी जिद्य सोडून संवेदनशीलतेने वागायला शिकलं पाहिजे, असा सल्लावजा टोमणा भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना लगावला आहे.

(हेही वाचा – त्रिपुरा : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का बसून ७ जणांचा मृत्यू, १८ जखमी)

पत्रकारांशी संवाद साधतांना पात्रा म्हणाले की, स्थानिक लोकांनी राहुल गांधी यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला होता. ‘राहुल गांधी परत जा’ अशा घोषणा दिल्या गेल्या. तसेच अनेक संघटनांनी देखील त्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. मणिपूरमधले वातावरण अजूनही संवेदनशील आहे. अशात राहुल गांधी यांना तिथे भेट देण्याची काय गरज होती. जर राहुल गांधींनी प्रशासनाला सहमती दिली असती तर आंदोलन झाले नसते, असे संबित पात्रा यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

ते म्हणाले की, राहुल गांधींच्या या दौऱ्यापूर्वीच ऑल मणिपूर स्टुडंट युनियनने या दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. अनेक नागरी संस्थांनीही राहुल गांधींनी मणिपूरमध्ये येऊन ठिणगी पेटवण्याचे काम करू नये, असे म्हटले होते. परंतु, आपण लोकशाही नांदत असलेल्या देशात राहतो आहे, म्हणूनच त्यांना मणिपूरला जाण्यापासून कोणीही रोखले नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.