त्रिपुरा : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का बसून ७ जणांचा मृत्यू, १८ जखमी

त्रिपुरात भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या एका आठवड्यानंतर उलटी रथयात्रा काढली जाते.

217
त्रिपुरा : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान मोठी दुर्घटना; विजेचा धक्का बसून ७ जणांचा मृत्यू, १८ जखमी

काही दिवसांपूर्वी जगन्नाथ यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. मात्र या यात्रेच्या समारोपावेळी एक दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुराच्या कुमारघाटमध्ये भगवान जगन्नाथच्या ‘उलटा रथयात्रा’ उत्सवादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. रथयात्रेच्या रथ एका हाय-टेन्शन वायरच्या संपर्कात आला, त्यामुळे रथाला भीषण आग लागली. हा अपघात बुधवार २८ जून दुपारी साडेचारच्या सुमारास झाला. यामध्ये २४ हून अधिक जण होरपळून निघाले तर ७ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

(हेही वाचा – गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी शासनाचे प्रयत्न – सुधीर मुनगंटीवार)

अहवालानुसार, हा उत्सव रथयात्रेच्या एका आठवड्यानंतर, भगवान बलदेव, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांच्या घरी परतण्याचे प्रतीक आहे. या जल्लोषाच्या वातावरणात, लोखंडापासून तयार केलेला ‘रथ’ ओढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी झाले होते. दुर्दैवाने, मिरवणुकीदरम्यान, ‘रथ’ अनावधानाने ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून अनेक लोकांचा मृत्यू झाला. सध्या जखमींवर उपचार सुरु आहेत. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या शरीरांना आग लागली होती. लोकांचा आरडा – ओरडा ऐकून अनेक जण मदतीसाठी पुढे आले. मात्र त्यांना मदत करता आली नाही. त्रिपुरात भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या एका आठवड्यानंतर उलटी रथयात्रा काढली जाते. यामध्ये देवाचा रथ मागून ओढला जातो. भगवान जगन्नाथ यांच्यासोबत भगवान बलभद्र आणि बहीण सुभद्रा रथावर स्वार असतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.