Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीतच रहाणार; मतदारसंघाची घोषणा लवकरच

Mahadev Jankar : महायुतीच्या प्रमुख तीन पक्षांच्या कोणाच्या खात्यातून जानकरांना मतदारसंघ दिला जाईल, ते कोणत्या जिल्ह्यात मैदानात उतरू शकतात, यावर अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

174
Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीतच रहाणार; मतदारसंघाची घोषणा लवकरच
Mahadev Jankar : महादेव जानकर महायुतीतच रहाणार; मतदारसंघाची घोषणा लवकरच

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी २४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अर्थात ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार यांची भेट घेतली. या वेळी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी ते महायुतीमध्येच रहाणार असल्याची घोषणा केली. महायुतीच्या वतीने रासपला एक जागा दिली जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या वेळी महादेव जानकर यांची देखील उपस्थिती होती. महादेव जानकर हे त्यांच्या ‘रासप’च्या चिन्हावरच लोकसभेच्या (loksabha election 2024) मैदानात उतरणार आहेत.

(हेही वाचा – Madha Lok Sabha Constituency : माढ्यातून लढण्यासाठी प्रशांत परिचारकही इच्छुक, भाजपमधील तिढा वाढतोय)

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट

महायुतीच्या प्रमुख तीन पक्षांच्या कोणाच्या खात्यातून जानकरांना मतदारसंघ दिला जाईल, ते कोणत्या जिल्ह्यात मैदानात उतरू शकतात, यावर अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यावर ठोस निर्णय घेतला जाईल, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भाजपवर टीका करत होते. आज अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू, असे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी या वेळी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.