Madha Lok Sabha Constituency : माढ्यातून लढण्यासाठी प्रशांत परिचारकही इच्छुक, भाजपमधील तिढा वाढतोय

Madha Lok Sabha Constituency : माढय़ात रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असताना परिचारक यांनी उडी घेतल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून, पक्षश्रेष्ठांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

258
Madha Lok Sabha Constituency : माढ्यातून लढण्यासाठी प्रशांत परिचारकही इच्छुक, भाजपमधील तिढा वाढतोय
Madha Lok Sabha Constituency : माढ्यातून लढण्यासाठी प्रशांत परिचारकही इच्छुक, भाजपमधील तिढा वाढतोय

माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीचा तिढा वाढतच चालला आहे. भाजपने माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मोहिते-पाटील आणि रामराजे निंबाळकर गट आक्रमक झाला आहे. त्यातच आता पंढरपुरातील भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक (prashant paricharak) यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपचा तिढा वाढतच चालला आहे. (Madha Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Swatantra Veer Savarkar : पुन्हा द्वेषाची पेरणी; स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाविषयी जाणीवपूर्वक पसरवली जात आहे नकारात्मकता)

भाजपच्या गोटात खळबळ

रामराजे, बबनदादा, संजयमामा यांच्यासह अनेकांनी मला माढा लोकसभेला उभे राहण्याचा आग्रह केला होता. मला उभे राहण्याची इच्छा नाही. मात्र, पक्षाने जबाबदारी दिली, तर आपण लढण्यास इच्छुक आहोत, असे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. माढय़ात रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असताना परिचारक यांनी उडी घेतल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून, पक्षश्रेष्ठांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, भाजपने बूथ लेव्हलपर्यंत कार्यकर्त्यांना सतर्क ठेवून निवडणुकीचे नियोजन केले आहे. त्यामुळे सोलापूर, माढा आणि सांगली या तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील पक्षाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास प्रशांत परिचारक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. (Madha Lok Sabha Constituency)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.