Thane Lok Sabha Constituency: ठाण्यात यंदा भाजपाचा उमेदवार?

180
 Thane Lok Sabha Constituency: ठाण्यात यंदा भाजपाचा उमेदवार?
 Thane Lok Sabha Constituency: ठाण्यात यंदा भाजपाचा उमेदवार?
  • सुजित महामुलकर

ठाणे जिल्हा हा मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून गेली काही वर्षे ओळखला जातो आहे. या बालेकिल्यावर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने दावा केला असून या ठिकाणी भाजपाचा उमेदवार असेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. (Thane Lok Sabha Constituency)

कल्याणमधून शिंदे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव, विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच उमेदवार असतील, असे जाहीर केले. या जागेवरही भाजपाचा दावा होता. मात्र असे असताना फडणवीस यांनी शिंदे यांची उमेदवारी घोषित करून महायुतीमधील सगळे घटक पक्ष त्यांच्या विजयासाठी काम करतील, अशी ग्वाहीदेखील दिली. (Thane Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – IPL 2024, GT bt RR : गुजरातचा कर्णधार शुभमन पंचांवर का चिडला?)

फडणवीस यांचे संकेत

त्याचवेळी कल्याणच्या बदल्यात ठाणे मतदार संघात भाजपाचा उमेदवार असेल, हे संकेत त्यांनी दिले. ठाणे मतदार संघासाठी भाजपाकडे माजी खासदार संजीव नाईक (Sanjeev Naik) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा असलेले भाजपा नेते डॉ विनय सहस्रबुद्धे यांची नावे चर्चेत आहेत. (Thane Lok Sabha Constituency)

सहापैकी चार आमदार भाजपाचे

ठाणे लोकसभा मतदार संघात, सहा विधानसभा क्षेत्र असून यापैकी चार जागांवर भाजपाचे वर्चस्व आहे तर दोन ठिकाणी शिवसेना (शिंदे) यांची ताकद आहे. कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदार संघातून एकनाथ शिंदे निवडून आले आहेत आणि माजिवाडाचे आमदार प्रताप सरनाईक हे शिवसेना (शिंदे) पक्षात आहेत. अन्य चार म्हणजे मीरा-भाईंदरमध्ये गीता जैन, बेलापूरमधून मंदा म्हात्रे, ठाणे विधानसभा मतदार संघातून संजय केळकर आणि ऐरोलीमध्ये गणेश नाईक हे भाजपाचे आमदार प्रतिनिधित्व करीत आहेत. (Thane Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Haryana Accident: हरियाणामध्ये भीषण अपघात; सहा मुलांचा जागीच मृत्यू)

नाईकांच्या नावावर शिक्कामोर्तब?

सहापैकी चार विधानसभा क्षेत्र भाजपाकडे असल्याने या ठाणे लोकसभा मतदार संघावर भाजपाचा उमेदवार देण्याचे जवळपास निश्चित झाले असून संजीव नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. नाईक यांनी या मतदार संघात प्रचारदेखील सुरू केला असून येत्या १-२ दिवसांत त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Thane Lok Sabha Constituency)

उबाठाकडून राजन विचारे

संजीव नाईक २००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले. त्यावेळी शिवसेना उमेदवार विजय चौगुले यांचा ५२,००० मतांनी पराभव झाला होता मात्र मनसेचे उमेदवार राजन राजे यांनी १.३४ लाख मते घेतली होती, हे विशेष. यंदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला असून महायुतीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाकडून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील दोन (२०१४, २०१९) निवडणुकांत विचारे हे भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आहेत. (Thane Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.