Haryana Accident: हरियाणामध्ये भीषण अपघात; सहा मुलांचा जागीच मृत्यू

146
Haryana Accident: हरियाणामध्ये भीषण अपघात; सहा मुलांचा जागीच मृत्यु
Haryana Accident: हरियाणामध्ये भीषण अपघात; सहा मुलांचा जागीच मृत्यु

हरियाणाच्या (Haryana Accident) महेंद्रगड (Mahendragarh) जिल्ह्यातील कनिना गावाजवळ शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. गुरुवारी (११एप्रिल) सकाळी ही घटना घडली. या अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर १५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. ही बस महेंद्रगडमधील जीआरएल शाळेची आहे. ही बस सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती. यावेळी ओव्हरेटक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस उलटली. (Haryana Accident)

(हेही वाचा –Arvind Kejriwal : आम आदमी पक्षात दलितांशी भेदभाव; Rajkumar Anand यांचा केजरीवालांवर घणाघात)

जखमी विद्यार्थ्यांना तत्काळ जवळच्या (Haryana Accident) सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये १०वी च्या वर्गात शिकणारे एकूण ३५ ते ४० विद्यार्थी असल्याचे सांगितलं जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. या अपघातात बसचालकही जखमी झाला, अशी माहिती आहे. (Haryana Accident)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.