Lok Sabha Elections 2024 : मतदानाच्या काळात कोणत्याही यात्रा, सुट्टी न करता मतदानाचा हक्क बजावा; डॉ नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

112
Lok Sabha Elections 2024 : मतदानाच्या काळात कोणत्याही यात्रा, सुट्टी न करता मतदानाचा हक्क बजावा; डॉ नीलम गोऱ्हे यांचे आवाहन
Lok Sabha Elections 2024 : मतदानाच्या काळात कोणत्याही यात्रा, सुट्टी न करता मतदानाचा हक्क बजावा; डॉ नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Elections 2024) जाहीर झाल्या मुळे येत्या काही दिवसात मतदान केले जाईल. देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्या कालावधीत कोणतेही तीर्थ यात्रा, ट्रीप किंवा इतर ठिकाणी जाण्याच्या तयारीत राहू नका. आपल्या आपल्या गावात, मतदार संघात रहा अशे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलामताई गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केले.

भोर विधानसभा, मुळशी बुथ प्रमुख बैठक व मार्गदर्शन मेळावा रविवार दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी घोटवडे ता. मुळशी येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) बोलत होत्या. प्रसंगी शिवसेना उपनेत्या कलाताई शिंदे, युवासेना सचिव किरण साळी, मेळाव्याच्या आयोजक जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबुराव चांदेरे, विविध शिवसेना पदाधिकरी, महीला कार्यकर्ते, बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Lok Sabha Elections 2024)

(हेही वाचा – Merchant Navy Week : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 61व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन)

सदर मेळाव्यात बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) म्हणाल्या; महिला ह्या प्रामाणिक असतात; देशाच्या इतिहासात कुठे ही बँकेला फसवून एखादी महिला पळून गेली असे उदाहरण नाही. मतदानाच्या बाबतीत देखील मतदार म्हणून महीला प्रामाणिक राहतील असा विश्वास मला आहे. कुठे पाण्याची गरज भासत असेल तर तहसीलदाराच्या साहाय्याने पाणी सुविधा पूर्ण करता येते. त्याला आचार संहिता लागू आहे म्हणून टाळू नका. मतदार आजारी असेल तर त्याला मदत करून मतदानासाठी प्रेरित करा असे प्रतिपादन देखील त्यांनी केले. (Lok Sabha Elections 2024)

जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, उपनेत्या कलाताई शिंदे, बाबुराव चांदरे, किरण साळी यांनी देखील आपले मनोगते व्यक्त केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.