History Of Andaman Jail : अंदमान जेलचा इतिहास पुसण्याचा नेहरु सरकारचा प्रयत्न पुराव्यानिशी आला समोर

वीर सावरकर यांचे छायाचित्र असलेलं पोस्टाचे तिकिट काढायलाही टाळाटाळ करण्यात आली. जवळपास ५ वर्षे विलंब करण्यात आला.

6458
History Of Andaman Jail: अंदमान जेलचा इतिहास पुसण्याचा नेहरु सरकारचा प्रयत्न पुराव्यानिशी आला समोर

स्वातंत्र्यसैनिकांची स्मृतिस्थळं नष्ट करण्याचा प्रयत्न नेहरू सरकारकडून करण्यात आला होता. १९६०-६१मध्ये तर अंदमानच्या सेल्युलर जेलचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न नेहरुंनी केला होता. अदमान जेलचा (History Of Andaman Jail) इतिहास पुसण्याचा नेहरु सरकारचा प्रयत्न पुराव्यानिशी समोर आला आहे. याबाबतचा पुरावा देत वीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ही पोस्ट समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. साने यांनी १५ जानेवारी १९६१ या दिवशी ‘केसरी’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली एक बातमी पोस्ट करत म्हटले आहे की, ‘अंदमानचे सेल्युलर जेल नष्ट करण्याची नेहरू सरकारची इच्छा होती. अगदी नेमक्या त्याच जागी त्यांना रुग्णालय बांधायचे होते. सशस्त्र क्रांतीचा इतिहास पुसून टाकून फक्त ‘दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल’ असा इतिहास रुजवण्याचे प्रयत्न कसे चालू होते, याचा हा पुरावाच! अंदमानात जणू काही दुसरी जागाच उपलब्ध नव्हती.’

समाजमाध्यमांवर केलेल्या पोस्टविषयी वीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने ‘हिंदुस्थान पोस्ट’ला म्हणाले की, ‘केसरीतील ही बातमी कशासाठी हायलाईट करत आहे? तर केवळ सावरकर विरोधासाठी अंदमानातील “खरे स्वातंत्र्यवीर” असे म्हणून एक यादी पुढे केली जाते; परंतु हेच सेल्युलर जेल पाडून टाकण्याचे धोरण त्यांचेच चाचा नेहरू यांचे कसे होते, भगतसिंग यांचे हौतात्म्य केवळ वीर सावरकरांचा द्वेष करण्यासाठी आणि त्यांना कमीपणा देण्यासाठी तुलनेसाठी समोर आणले जाते; परंतु प्रत्यक्षात भगतसिंग यांना वाचवण्याचा गांधींनी कोणताही प्रयत्न केला नाही. प्रत्येक सशस्त्र क्रांतिकारक हा अत्याचारी आणि वाट चुकलेला असून त्यांच्या मार्गाने गेल्यास खबरदार, असे इशारे गांधींनी दिलेले होते आणि आज हे कोणत्या तोंडाने त्यांचे नाव पुढे करतात, तर केवळ सावरकर द्वेषासाठी. केवळ सावरकरच नव्हे, तर प्रत्येक सशस्त्र क्रांतिकारकाचा या लोकांनी द्वेष केला आहे; कारण त्याच्याशिवाय त्यांना राष्ट्राचे खोटे पितृत्व एकाच व्यक्तीला देता येणार नाही.

(हेही वाचा – Vijay Shivtare : माझा नेता संधीसाधू, लेचापेचा, छक्के पंजे करणारा निघाला; बारामतीत पुन्हा निनावी पत्र)

नेहरु सरकार आणि कॉंग्रेसचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न
सेल्युलर जेलच्या आत विंग्ज आहेत. त्यातली २ विंग्ज जपानच्या हल्ल्यात पडल्या. नेहरु सरकार संपूर्ण तुरुंगच पाडायला निघालं होतं. त्यातली आणखी २ विंग्ज पाडून तिथे रुग्णालय बांधण्यात आलं आहे. सुदैवाने वीर सावरकरांची खोली सुरक्षित आहे. त्यामुळे अंदमानचे सेल्युलर जेल नष्ट करण्याची नेहरु सरकारची इच्छा होती. सशस्त्र क्रांतीचा इतिहास पुसून टाकण्याचा हा प्रयत्न होता. तसेच स्वातंत्र्य आमच्याच प्रयत्नाने, अहिंसक मार्गाने मिळालं, हे दाखवण्यासाठी नेहरु सरकार आणि कॉंग्रेस यांनी इतिहास नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. याशिवाय सत्याग्रह आणि कॉंग्रेसचे लढे म्हणजेच स्वातंत्र्याचे लढे का? तर सशस्त्र क्रांतिकारकांचं योगदान भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आहे, हेही या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न समाजमाध्यमावर पोस्ट करून केला आहे, अशी भावना वीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केली.

वीर सावरकरांच्या पोस्टाच्या तिकिटाला विलंब
वीर सावरकर यांचे छायाचित्र असलेलं पोस्टाचे तिकिट काढायलाही टाळाटाळ करण्यात आली. जवळपास ५ वर्षे विलंब करण्यात आला. डॉ. होमी भाभा आणि वीर सावरकर यांचे एकाच वर्षी निधन झाले, पण होमी भाभा यांचं टपाल तिकीट लवकर प्रसिद्ध झालं, मात्र वीर सावरकरांचं पोस्टल तिकिट निघायला १९७० साल उजाडावं लागलं, अशीही खंत चंद्रशेखर साने यांनी व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.