Nitin Gadkari : नितीन गडकरींनी सांगितले ४०० पारचे गणित; म्हणाले आमच्या सरकारने…

201
Nitin Gadkari : नितीन गडकरींनी सांगितले ४०० पारचे गणित; म्हणाले आमच्या सरकारने...
Nitin Gadkari : नितीन गडकरींनी सांगितले ४०० पारचे गणित; म्हणाले आमच्या सरकारने...

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) अबकी बार.. 400 पार, असा दावा भाजपचे नेते प्रत्येक व्यासपिठावर करत आहेत. भाजपचे ध्येय 370 आणि रालोआचे ध्येय 400+ असे गणित सांगितले जात आहे. याविषयी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यावर भाष्य केले आहे.

पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपद भूषवतील; कारण सरकारने गेल्या 10 वर्षांत अनेक ठोस कामे केली आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 400 जागांचा आकडा पार करेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. सध्या अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा मोदी सरकार वापर करत असल्याचे विरोधकांचे आरोप फेटाळून लावत गडकरी म्हणतात, विरोधकांनी जनतेचा विश्वास मिळवून परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे नितीन गडकरी या वेळी म्हणाले आहेत.

(हेही वाचा – Merchant Navy Week : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते 61व्या मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन)

दक्षिण आणि ईशान्य भागात खूप काम केले

आमच्या पक्षाने गेल्या 10 वर्षात दक्षिण आणि ईशान्य भागात खूप काम केले आहे. ज्याचे परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिसतील. गेल्या काही वर्षांत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजप मजबूत झाला आहे. आम्ही तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये खूप मेहनत घेतली. गेल्या काही वर्षांत पक्षाने उत्तर भारतातही चांगली कामे केली. दक्षिणेत भाजपचे अस्तित्व कमी आहे, परंतु यंदा दक्षिणेत आमची कामगिरी चांगली असेल. त्यामुळेच एकट्या भाजपला 370 जागा मिळतील आणि एनडीए 400 चा आकडा पार करेल, असे गणित गडकरी यांनी सांगितले.

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदींविषयी बोलताना गडकरी म्हणाले की, देशातील जनतेला विकास पहायचा आहे, त्यामुळेच त्यांचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. निवडणुकीत हा विश्वास स्पष्टपणे दिसून येईल. यंदाही आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि आम्ही 400 चा आकडाही पार करू. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होतील, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.