Lok Sabha Elections: ‘व्हॉटस-अॅप’ विद्यापीठ जोरात, निवडणूक निकालाच्या अंदाजाचा पाऊस

139
Lok Sabha Elections: ‘व्हॉटस-अॅप’ विद्यापीठ जोरात, निवडणूक निकालाच्या अंदाजाचा पाऊस
Lok Sabha Elections: ‘व्हॉटस-अॅप’ विद्यापीठ जोरात, निवडणूक निकालाच्या अंदाजाचा पाऊस

एकीकडे लोक प्रचंड उकड्याने हैराण झाले आहेत. मान्सूनच्या पावसाला किमान पंधरा दिवस शिल्लक आहेत. ‘व्हॉटस-अॅप’वर (WhatsApp) मात्र महायुती आणि महाविकास आघाडीच्या किती जागा निवडून येतील, याबाबतच्या अंदाजित आकड्यांचा अक्षरशः पाऊस सुरू झाला आहे. विशेषतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे यांच्या शिवसेनेत ‘व्हॉटस-अॅप’ (WhatsApp) विद्यापीठ अभ्यासकांना अधिक रस असल्याचे दिसून येत आहे.

‘एक्झिट पोल’चा भडिमार होण्याची शक्यता

लोकसभा 2024 निवडणुकीचे (Lok Sabha Elections) राज्यातील पाचही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. अन्य राज्यातील काही टप्पे अद्याप बाकी असून निकाल 4 जूनला लागणार आहे. त्यामुळे पुढील किमान दहा दिवस आणखी काही व्हॉटस-अॅप (WhatsApp) विद्यापीठ तज्ञ अॅक्टीव होऊन ‘एक्झिट पोल’चा भडिमार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(हेही वाचा – Heat Stroke: पश्चिम आशियात उष्मघाताचे ५६ बळी; ७ देशांचे तापणात ४५ अंशाच्या पुढे)

दोन्ही राष्ट्रवादीकडून एकही उमेदवार नाही

निवडणूक काळात सर्वाधिक चवीने चर्चा होत होती ती भाजपा-शिवसेना विरुद्ध काँग्रेस-उबाठा आणि पवार कुटुंब विरुद्ध अजित पवार यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांची. गेल्या सोमवारी, 20 मे ला राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला आणि निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद बिलकुल नसल्यासारखेच आहे तसेच लोकसभेसाठी दोन्ही राष्ट्रवादीकडून एकही उमेदवार देण्यात आलेला नव्हता. (Lok Sabha Elections)

तीन मतदार संघात सेना विरुद्ध सेना

याउलट मुंबईतील सहापैकी तीन मतदार संघांमध्ये शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना उबाठा अशी थेट लढत होत असल्याने जुने आणि नवे शिवसैनिक, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) समर्थक आणि विरोधक अशी लढत झाली. मुंबईत ठाकरे नावाशी प्रामाणिक जसे आहेत तसे बाळासाहेबांच्या विचारांचे हिंदू समर्थक, काँग्रेसची साथ दिल्याने नाराज झालेले शिवसैनिक, मुस्लिम समाजाचे लांगूलचालन करणारे ठाकरे आणि मुख्यमंत्री पदासाठी 30 वर्षाची तोडलेली राजकीय मैत्री यामुळे उद्धव यांची भूमिका न पटलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थकदेखील आहेत. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : भारतीय संघाला संपवायचाय आयसीसी चषकाचा दुष्काळ)

मोदी समर्थक आणि मोदी समर्थक

एकूणच महायुती किंवा मोदी समर्थक आणि महाविकास आघाडी किंवा मोदी समर्थक आणि असे दोन मतप्रवाह तयार झाले आणि त्यांच्याकडून राज्यातील 48 मतदार संघांचे संभाव्य यशस्वी उमेदवार अशी यादी व्हॉटस-अॅपवर (WhatsApp) फिरत आहे. यातून विश्लेषण कमी आणि मोदी द्वेष अधिक दिसून येत आहे. तसेच मनातील सुप्त इच्छा आकडेवारीतून व्यक्त करण्याचा काहीसा प्रकार असल्याचे स्पष्ट होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.