Heat Stroke: पश्चिम आशियात उष्मघाताचे ५६ बळी; ७ देशांचे तापणात ४५ अंशाच्या पुढे

117
Heat Stroke: पश्चिम आशियात उष्मघाताचे ५६ बळी; ७ देशांचे तापणात ४५ अंशाच्या पुढे

भारतासह अनेक देशांत उष्णतेची लाट पसरली आहे. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, माली आणि लिबियामध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या (45 degrees Celsius) पुढे गेले आहे. पश्चिम आशियामध्ये (West Asia) (सिरिया, इस्रायल, पॅलेस्टाईन,जॉर्डन, लेबनॉन) तापमान पाच पट वाढले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धामुळे उष्णतेची लाट वाढली आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, अनेक देशांमध्ये रात्रीही उष्णतेची लाट सुरू आहे. तर आशियातील उष्णतेचे लाटेचे हे सलग तिसरे वर्ष आहे. याचे एक कारण म्हणजे बुधवारी पाकिस्तानातील जेकबाबाद येथे सर्वाधिक तापमान होते. येथील तापमान ४८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.  (Heat Stroke)

(हेही वाचा – Lok Sabha Election च्या सहाव्या टप्प्यात शेतकरी नेते भाजपाच्या विरोधात सक्रीय; काय केले आवाहन?)

पाकिस्तान- शाळा बंद, रुग्णालये हाय अलर्टवर

पाऊस आणि पुरामुळे हैराण झालेल्या पाकिस्तानला (Pakistan) आता उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. मोहेंजोदारोचे तापमान ४८.५ अंशांवर पोहोचले आहे. हे सामान्य तापमाना पेक्षा ८ अंश जास्त आहे. येथे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ३१ मे पर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णालयांना हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. व्हिएतनाममध्ये उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात मासे मरण पावले. अनेक तलाव पूर्णपणे कोरडे पडले. सरकारने लोकांना घरातच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

(हेही पाहा – Pune Hit And Run Case: काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ‘पब’विरोधी की बाजूने?)

बांगलादेश- २६ दिवसांपासून उष्णतेची लाट, शाळा बंद

बांगलादेशात (Bangladesh) सलग २६ दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे. तापमान ४३.८  अंशांवर पोहोचले, जे सरासरीपेक्षा ७ अंशांनी अधिक आहे. येथे आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. थायलंडमध्येही उष्णतेमुळे ३० हून अधिक मृत्यू झाले आहेत. त्यामुळे येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

म्यानमार- एप्रिलपासून गेल्या आठवड्यापर्यंत दररोज ४० मृत्यू

एप्रिलपासूनच म्यानमारमध्ये (Myanmar) उष्णतेची लाट सुरू झाली. यामुळे एप्रिल ते १० मे या कालावधीत देशात दररोज ४० मृत्यू झाले. येथील तापमान ४८.२ अंशांवर पोहोचले आहे. मेक्सिकोच्या जंगलात उष्णतेमुळे माकडे झाडांवरून पडून मरत आहेत. ज्या भागात माकडे मरत आहेत, तेथे तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत १३८ माकडांचा मृत्यू झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे २६  जणांचा मृत्यू झाला आहे. (Heat Stroke)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.