Lok Sabha Elections 2024 : मुंबईत काँग्रेसला फक्त एकच जागा, उबाठा शिवसेना लढणार पाच जागा?

एका बाजुला जागेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच उबाठा शिवसेनेने मुंबईतील दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मतदार संघातून अनुक्रमे अरविंद सावंत तसेच अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

192
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत ५ वर्षांत ३० टक्क्यांनी बेघर मतदार वाढले
विशेष प्रतिनिधी,मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) उबाठा शिवसेना आणि काँग्रेस व शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी झाली असली तरी मुंबईतील सहा मतदार संघापैंकी उत्तर मध्य मुंबई वगळली तर उर्वरीत सर्वच जागांवर उबाठा शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे मुंबईत काँग्रेस पक्षाला केवळ एकच जागा सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईत काँग्रेस पक्ष केवळ एका जागेवर समाधानी होणार का की एका जागा त्यांना मान्य होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इंडि आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच वंचित बहुजन आघाडी यांची राज्यात महाविकास आघाडी झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections 2024) ते एकत्रपणे भाजपसह महायुतीच्या विरोधात आव्हान निर्माण करणार आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जागा वाटपाची चर्चा सुरु असून कोणत्याही पक्षाला किती जागा आणि उमेदवारांची यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

मात्र,एका बाजुला जागेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच उबाठा शिवसेनेने मुंबईतील दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मतदार संघातून अनुक्रमे अरविंद सावंत तसेच अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर दक्षिण मुंबईतून पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी निवडणूक लढवण्याच्यादृष्टीकोनातून मतदार संघाची बांधणी तथा तोंड ओळख करून घेण्यास सुरुवात केली आहे. तर ईशान्य मुंबईतून संभाव्य उमेदवार म्हणून संजय दिना पाटील यांच्या नावावरही अधिकृत शिक्कामोर्तब झाला असून अधिकृत घोषणा झालेली आहे. तसेच उत्तर मुंबईतून माजी विभागप्रमुख व उपनेते विनोद घोसाळकर यांचेही संभाव्य उमेदवार म्हणून उबाठा शिवसेनेकडून नाव चालवले जात आहे.

(हेही वाचा – Pakistan Army: पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयच्या ठिकाणांवर बीएलएकडून हल्ला, ग्वादर बंदरावर भीषण गोळीबार)

शिवसेनेचे अधिकृत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम हे तीन मतदार संघ असून ईशान्य मुंबईची मागणी करत त्यांनी उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन मतदार संघ काँग्रेसला सोडण्याचा निर्धार केला आहे. त्यातच आता उत्तर मुंबईतून उबाठा शिवसेनेने विनोद घोसाळकर यांचे नाव सोशल मिडियाद्वारे चालवून चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईतील पाच लोकसभा मतदार संघावर उबाठा शिवसेनेची नजर असून केवळ एकच मतदार संघ काँग्रेसला सोडला जाण्याची शक्यता आहे.

सन २००९मध्ये मुंबईतील सहाही मतदार संघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. परंतु सन २०१४च्या आणि २०१९च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी तीन खासदार निवडून आले होते. परंतु ज्या मुंबईत काँग्रेसचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक खासदार निवडून आला होता, तिथे त्याच काँग्रेसची केवळ एकाच जागेवर बोवळण करत उबाठा शिवसेनेकडून गुंडाळले जात आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना हाताशी धरून ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई हे मतदार संघ आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न उबाठा शिवसेनेकडून सुरु आहे.

दक्षिण मध्य मुंबई हा मतदार संघ शिवसेनेचा असला तरी खासदार राहुल शेवाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्य नेता असलेल्या शिवसेनेत गेले आहे. त्यामुळे या मतदार संघातून उबाठा शिवसेनेने पक्षाचे नेते अनिल देसाई यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला मागून घेता येवू शकला असता. आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड हे दोन वेळा या मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे जेव्हा उत्तर मुंबई व ईशान्य मुंबईचे मतदार संघ उबाठा देण्याचा विचार करताना दक्षिण मध्य मुंबई हा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे घेता आला असता. परंतु काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा यांना केवळ आपला मतदार संघ असलेल्या धारावीची चिंता असून धारावीमध्ये त्यांना पुन्हा निवडून आणणे आणि धारावी विकास प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उबाठा शिवसेनेची लागणारी मदत लक्षात त्यांनी उत्तर मध्य लोकसभा मतदार संघ वगळता उर्वरीत सर्व मतदार संघ उबाठाला बहाल करण्याचा निर्धार केल्याचे बोलले जात आहे. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.