Lok Sabha Elections 2024 : महाराष्ट्र काँग्रेसकडून ‘या’ १२ उमेदवारांची घोषणा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा-गोंदियाहून निवडणूक लढवण्यास सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

278
Lok Sabha Election 2024 : प्रथमच काँग्रेस कमी जागांवर निवडणूक लढविणार

काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Elections 2024) तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघेही प्रचारात गुंतले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जागावाटपाबाबत गुरुवारी (२१ मार्च) अंतिम निर्णय होणार आहे. अशातच काँग्रेसने महाराष्ट्रातील ११ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

(हेही वाचा – Marathwada Earthquake : मराठवाड्यात जाणवले भूकंपाचे धक्के; ४.२ रिश्टर स्केल इतकी तीव्रता)

राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस (Lok Sabha Elections 2024) या निवडणुकीत सुमारे १९ जागा लढवणार आहे. ठाकरे गट २३ तर राष्ट्रवादी काँग्रेस सहा जागा लढवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत.

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : मुंबईत काँग्रेसला फक्त एकच जागा, उबाठा शिवसेना लढणार पाच जागा?)

उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ

नागपूर – विकास ठाकरे
नांदेड – वसंत चव्हाण
लातूर – डॉ. शिवाजी काळगे
नंदुरबार – के.सी.पाडवी
गडचिरोली – नामदेव उसेंडी
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती
सोलापूर – प्रणिती शिंदे
पुणे – रविंद्र धंगेकर
अकोला – अभय पाटील
अमरावती – बळवंत वानखेडे

(हेही वाचा – Supreme Court : मोफत ‘भेटवस्तू’ देण्याच्या आश्वासनांबाबत सर्वोच्च न्यायालयाची कडक भूमिका)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा-गोंदियाहून निवडणूक लढवण्यास सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. (Lok Sabha Elections 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.