Lok Sabha Election 2024 : तेलंगणात भाजपा-काँग्रेस आक्रमक, बीआरएसपुढे अस्तित्वाचा प्रश्न

लोकसभेच्या मागील निवडणुकीत बीआरएसला नऊ, भाजपाला चार आणि काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएमने चार दशकांपासून हैदराबादच्या जागेवर आपली परंपरागत पकड कायम ठेवली होती.

76
Lok Sabha Election 2024 : तेलंगणात भाजपा-काँग्रेस आक्रमक, बीआरएसपुढे अस्तित्वाचा प्रश्न

तेलंगणातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याची मुख्य स्पर्धा आहे ती काँग्रेस आणि भाजपामध्ये. बीआरएसपुढे मात्र आव्हान मोठे आहे. केसीआर यांना जनाधार वाढविण्यासाठी लढावं लागणार आहे. संघटनेची विस्कटत चाललेली घडी सुध्दा पुर्वपदावर आणावी लागणार आहे. तर, हैदराबादच्या पारंपारिक मतदारसंघातून विजय मिळविण्यासाठी असदुद्दीन ओवैसी यांना तारेवरची कसरत करावी लागेल. (Lok Sabha Election 2024)

लोकसभेच्या मागील निवडणुकीत बीआरएसला नऊ, भाजपाला चार आणि काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष एआयएमआयएमने चार दशकांपासून हैदराबादच्या जागेवर आपली परंपरागत पकड कायम ठेवली होती. मात्र, लोकसभेच्या या निवडणुकीत वातावरण फार बदलले आहे. सत्तेच्या समीकरणासोबतच लोकांचा राजकीय दृष्टीकोन सुध्दा बदलला आहे. (Lok Sabha Election 2024)

तेलंगणात लोकसभेच्या १७ जागा आहेत. यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी कॉंग्रेस, भाजपा आणि बीआरएस यांच्यात मुख्य लढत होणे आहे. महत्वाचे म्हणजे, पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भारत राष्ट्र समितीला सत्ताच्यूत करून तेलंगणाची सत्ता आपल्या हाती घेतली. आता कॉंग्रेसला यापूर्वीचा रेकॉर्ड मोडून जास्त जागा जिंकायच्या आहेत. भाजपालाही दक्षिणेत कमळ फलवायचा आहे. यात सर्वात मोठे आव्हान कुणासमोर असेल तर ते माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसपुढे आहे. स्वतंत्र राज्य झाल्यापासून केसीआर यांची सत्ता होती. (Lok Sabha Election 2024)

यावेळी परिस्थिती बदलली आहे

गेल्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसला नऊ, भाजपाला चार आणि काँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या. असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्ष ऑल इंडिया मजलिसे-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM) ने चार दशकांपासून हैदराबादच्या जागेवर आपली परंपरागत पकड कायम ठेवली होती. परंतु यावेळी पाच वर्षांपूर्वीसारखी हवा राहिली नाही. सत्तेच्या समीकरणाबरोबरच राजकारणाचा दृष्टिकोनही बदलला आहे. (Lok Sabha Election 2024)

राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसोबत (ABVP) राजकारण सुरू करणारे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करून पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेले रेवंत रेड्डी हे भाजपच्या पध्दतीचा उपयोग करून कॉग्रेसच्या जागा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Lok Sabha Election 2024)

विधानसभेच्या निवडणुकीत बाजी पलटली आणि रेवंत रेड्डी मुख्यमंत्री बनले. आता त्यांच्या निशाण्यावर केसीआरच राहणार आहेत. सत्तेतून हकालपट्टी होताच केसीआर यांचे पक्षावरील नियंत्रणही सैल झाले आहे. पक्ष कमकुवत होत चालला आहे. बीआरएसचे तीन आमदार काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. हैदराबादच्या महापौर विजयालक्ष्मी आणि त्यांचे वडील केशव राव यांनीही बीआरएसला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Lok Sabha Election 2024)

काही बीआरएस आमदार बाजू बदलू शकतात

पत्रकारितेतून काँग्रेसमध्ये आलेले केशव राव तेलंगण आंदोलनात केसीआर यांच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र हवा बदलताच ते काँग्रेसमध्ये परत आले. तेलंगणात ज्याची सत्ता असते त्याचेच वर्चस्व असते, असे म्हटले जाते. सध्या रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे त्याचा फायदाही काँग्रेसलाच मिळत आहे. येत्या काही दिवसांत बीआरएसचे आणखी काही आमदार पक्ष बदलून भाजपा किंवा काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – IPL 2024, Virat Kohli : स्ट्राइक रेटमुळे ट्रोल झालेल्या विराटला ब्रायन लाराचा पाठिंबा)

भाजपाचे नऊ उमेदवार बीआरएसमधून आलेले

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीत आठ जागा जिंकणारा भाजपाही पक्षांतराच्या खेळात मागे नाही. बीआरएस नेत्यांना तिकीट देऊन भाजपा तेलंगणात सुपीक जमीन तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपाने राज्यातील १७ पैकी नऊ जागांवर बीआरएसच्या नेत्यांना तिकीट दिले आहे. लोकसभा निवडणुकीचे स्वरूप विधानसभा निवडणुकीपेक्षा थोडे वेगळे आहे. विधानसभा निवडणुकीत जे मतदार इतर पक्षांना मतदान करतात तेच मतदार लोकसभा निवडणुकीत भाजपासोबत उभे राहिलेले दिसतात. (Lok Sabha Election 2024)

गेल्या लोकसभा निवडणुकीत नऊ जागा जिंकणाऱ्या बीआरएसला दोन्ही राष्ट्रीय पक्षांविरुद्ध मुख्य लढतीत राहण्यासाठी धडपड करावी लागत आहे. तसे न झाल्यास भाजपा-काँग्रेस यांच्यातच लढत होईल आणि मतांची टक्केवारी आणि जागांच्या बाबतीत भाजपा पुढे येईल यात नवल नाही. (Lok Sabha Election 2024)

द्विपक्षीय संकटात केसीआर

काँग्रेस आणि भाजपाने केलेल्या तोडफोडीमुळे केसीआरपुढे नवीन आव्हान उभे झाले आहे. पाच महिन्यांपूर्वी बीआरएस अजिंक्य मानली जात होती. केसीआर यांचा स्वत:वर इतका विश्वास होता की त्यांनी विधानसभा निवडणुकीपेक्षा राष्ट्रीय राजकारणावर अधिक लक्ष केंद्रित केले. ते राज्याबाहेर स्वत:साठी नव्या भूमिकेच्या शोधात होते. पण राज्याच्या निवडणुकीच्या निकालाने समीकरण बदलले. बीआरएसचा दारुण पराभव झाला. खराब कामगिरीने केसीआरला गुडघे टेकले. आता संघटना मजबुत करायची आहे. शिवाय मुलगी के. कविता ईडीच्या तुरूंगात आहे. अशात, दुहेरी आव्हानांचा सामना केसीआर यांना करावा लागत आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.