Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या परीक्षेत कोणते मंत्री झाले पास, कोणते नापास ? जाणून घ्या

205
Lok Sabha Election 2024 : लोकसभेत क्षेत्रीय पक्षच 'दादा'च्या भूमिकेत

महायुती सरकारमधील २९ मंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात महायुतीला कुठे फटका बसला, तर कुठे मोठे यश मिळाले. लोकसभा निकालासंदर्भात मंत्र्यांच्या रिपोर्ट कार्डचा विचार करता काहींना उत्तम गुण मिळाले, तर काही जण सपशेल नापास झाले.  (Lok Sabha Election 2024)

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर व हातकणंगले हे २ मतदारसंघ आहेत. तिथे हसन मुश्रीफ मंत्री आहेत. कोल्हापुरात महायुती हरली, पण हातकणंगलेत जिंकली. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे ३ मंत्री जळगाव जिल्ह्याचे आहेत. तेथे जळगाव व रावेर मतदारसंघ येतात. दोन्हींवर भाजपाने यश मिळविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा गड राखला. शिंदेंचे पुत्र डॉ. श्रीकांत कल्याणमध्ये जं.थे भाजपाचे रवींद्र चव्हाण मंत्री आहेत. त्यांच्याकडेच पालघरचीही जबाबदारी होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजयी झाले; पण रामटेकची जागा महायुतीने गमावली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी मतदारसंघ रामटेकमध्ये येतो. पुणे जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ हे चार मतदारसंघ येतात. उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि चंद्रकांत पाटील हे ३ मंत्री या जिल्ह्याचे आहेत. पुणे आणि मावळमध्ये भाजपा-शिंदेसेना जिंकली; पण बारामती व शिरूरमध्ये अजित पवार गटाचा पराभव झाला. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Maldives President Mohamed Muizzu यांनी सलग तिसऱ्या विजयाबद्दल केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन!)

मंत्र्यांची मुलेही झाली पराभूत
– नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना यांचा दारुण पराभव झाला.

  • अहमदनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या मुलाला निवडून आणण्यात अपयशी ठरले. शिवाय त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या शिर्डीत शिंदेसेना हरली.

लीड मिळूनही झाला पराभव
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधानसभा मतदारसंघ ज्या दक्षिण मुंबईत येतात तिथे शिंदेसेनेचा पराभव झाला. लोढांच्या मतदारसंघातून ४७ हजारांचे लीड मिळूनही यामिनी जाधव विजयी होऊ शकल्या नाहीत.

कुठे मिळाले यश, तर कुठे अपयश
– छगन भुजबळ आणि दादा भुसे असे दोन मंत्री असलेल्या १ नाशिक जिल्ह्यात महायुती साफ झाली. शिंदेसेनेचे मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद मतदारसंघातही महायुतीचा पराभव झाला. मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रयत्न करूनही बीडचा गड भाजपाला राखता आला नाही. दीपक केसरकर व उदय सामंत हे मंत्री असलेल्या रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे नारायण राणे जिंकले.
– शिंदेसेनेचे मंत्री संजय राठोड हे आपल्याच पक्षाच्या २ राजश्री पाटील यांना जिंकवू शकले नाहीत. सुरेश खाडे यांच्या बाबतीत सांगलीत तसेच घडले. शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात सातारा आणि माढाचा काही भाग येतो. पैकी सातारची जागा भाजपाने जिंकली तर माढ्याची जागा गमावली.
– छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतुल सावे आणि अब्दुल ३ सत्तार हे दोन मंत्री आहेत. तिसरे मंत्री संदीपान भुमरे स्वतःच उमेदवार होते. तेथील औरंगाबादची जागा महायुतीने जिंकली, तर जालन्याची गमावली. मंत्री अदिती तटकरे यांच्या रायगडमध्ये त्यांचे वडील सुनील तटकरे जिंकले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.