Lok Sabha Election 2024 : मुस्लिम पट्ट्यात मतांचा ‘वर्षा’व, महायुतीचे बळ स्वत:च्या मतदारसंघात पडले कमी

313
Lok Sabha Election 2024 : मुस्लिम पट्ट्यात मतांचा ‘वर्षा’व, महायुतीचे बळ स्वत:च्या मतदारसंघात पडले कमी
Lok Sabha Election 2024 : मुस्लिम पट्ट्यात मतांचा ‘वर्षा’व, महायुतीचे बळ स्वत:च्या मतदारसंघात पडले कमी
  • सचिन धानजी,मुंबई

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचा निकाल आयपीएलमधील कमी चेंडुत जास्त धावा असताना मिळवलेल्या विजयासारखाच ठरला आहे. पहिल्या १२ व्या फेरीपर्यंत तब्बल ६० हजार मतांनी पुढे असलेल्या भाजपाचे उज्ज्वल निकम यांचे मताधिक्य पुढील सर्व फेऱ्यांमध्ये कापून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शेवटच्या फेरीमध्ये तब्बल साडे सोळा हजारांच्या फरकांनी निवडून आल्या. म्हणजे शेवटच्या सहा चेंडुमध्ये २५ ते ३० धावांची गरज असताना तसेच गोलंदाज चांगला असल्याने ज्याप्रकारे आपण जिंकण्याची आशा सोडतो, आणि रिंकू सिंह आणि तेवतिया यांचे सारखे खेळाडू प्रत्येक चेंडुवर सिक्सर ठोकत संघाला विजय मिळवून देतात, तसंच या मतदार संघातील विजयाचे वर्णन करता येईल. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचा विजय उबाठा शिवसेनेने केलेल्या मदतीचा हात तर आहेतच पण सर्वांत मोठा विजयाचा वाटा आहे मुस्लिम मतदारांचा आहे, जो वांद्रे पूर्व, कलिना,कुर्ला आणि चांदिवलीमधून मिळालेल्या अधिकच्या मतांवरून दिसून येते. (Lok Sabha Election 2024)

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात दोन्ही उमेदवारांची घोषणा शेवटच्या क्षणी करण्यात आली, त्यामुळे दोघांनाही प्रचारासाठी वेळ फारच कमी मिळाला होता. भाजपाने या मतदार संघात ज्येष्ठ सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम आणि काँग्रेसने मुंबई काँग्रेस प्रदेशच्या अध्यक्षा आणि धारावीतील आमदार प्रा वर्षा गायकवाड यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते. विशेष म्हणजे दोन्हीही उमेदवार बाहेरचे असल्याने मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हताच. पण वर्षा गायवाकड यांना शिवसेनेने कार्यकर्त्यांपासून इतर सर्व रसद पुरवल्यामुळे त्यांना जास्त बांधणी करण्याची गरज भासली नाही. मात्र, दुसरीकडे उज्ज्वल निकम हे काही मनापासून निवडणुकीत उतरल्याचे दिसत नव्हते. परंतु भाजपाचे कार्यकर्ते सवयीप्रमाणे जोमाने कामाला लागले होते. परंतु या मतदार संघातील मुस्लिम बहुल वस्त्यांना काँग्रेसने केंद्रीत केले आणि मोदी विरोधात मतदान करण्यासाठी त्यांना प्रेरित करत रस्त्यावर उतरवले. ज्यामुळे गायकवाड यांना विलेपार्ले आणि वांद्रे पश्चिम मधून जास्त मते मिळवता आली नसली तरी कालिना, चांदिवली,वांद्रे पूर्व आणि कुर्ला परिसरातून मतदान झाले. आणि याच सर्व विधानसभा क्षेत्रात सर्वांधिक मुस्लिम मतदार आहेत, जे केवळ मोदी यांना पाडण्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि त्यातच हाताचा पंजा हे चिन्ह असल्याने त्यांनी गायकवाड यांना डोळे झाकून मतदान केले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Punjab मध्ये खालिस्तान समर्थक Amritpal विजयी; काँग्रेसला 7, तर आपला 3 जागा)

या मतदार संघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना ४ लाख ४५ हजार ५४५ मते मिळाली, तर भाजपाचे उज्ज्वल निकम यांना ४ लाख २९ हजार ०३१ मतदान झाले. त्यामुळे पहिल्या १२ फेरीपर्यंत ६० हजारांनी आघाडीवर असणाऱ्या निकम यांचे मताधिक्य कापून पुढील फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या निकम यांच्या मतांच्या बरोबरीला येवून पोहोचल्या. ६० हजारांचे मताधिक्य कमी करून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) या ३५२१ मतांनी मागे राहिल्या, त्यानंतर निकम हे केवळ गायवाड यांच्यापेक्षा १७६ मतांनीच पुढे होते. परंतु यानंतर जी काही सुसाट गाडी सुटली की गायकवाड यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर प्रथमच गायकवाड या ३१२१ मतांनी आघाडी मिळवली अणि पुढील प्रत्येक फेरींमध्ये त्या निकम यांच्या पेक्षा अधिक मते मिळवत आघाडीवर राहिल्या. त्यामुळे निकम हे सशाच्या चालीने पुढे निघुन गेले असले तरी कासवगतीने गायकवाड यांनी विजयाचे लक्ष्य पार करत निकम यांना मागे सोडले. (Lok Sabha Election 2024)

या निवडणूक निकालामध्ये विलेपार्ले मतदार संघातून निकम यांना ९८,३४१ मते मिळाली तर गायकवाड यांना केवळ ४७,०१६ मते मिळाली, पण चांदिवली मतदार संघात निकम यांना ९८ हजार ६६१ आणि गायकवाड याना १ लाख ०२ हजार९८५ मते मिळाली. जिथे भाजपा आणि शिवसेनेची ताकद असली तरी काँग्रेस नेते नसीम खान यांचाही विभाग आहे. त्यामुळे भाजपाने त्यांना या मतदार संघात जास्त लिड घेऊ दिले नाही. पण भाजपालाही जास्त मिळवता आले नाही. तर कुर्ला विधानसभा क्षेत्रात गायकवाड यांना सुमारे २४ हजारांचे मताधिक्य होते, तर कलिनामध्ये सुमारे १६ हजारांचे, वांद्रे पूर्व मध्ये सुमारे २८ हजारांचे मताधिक्य होते. आणि वांद्रे पश्चिमध्ये निकम यांना ७२,९५३ मते मिळाली आणि गायकवाड यांना ६९,३४७ मते मिळाली. या मतदार संघात जर निकम यांना विलेपार्ले प्रमाणे २५ ते ३० हजारांच्या मतांची आघाडी मिळाली असती तर गायकवाड यांच्या विजयाचे चित्र दिसले नसते.

(हेही वाचा – Crime : वाढदिवसाचा केक उशीरा आणला म्हणून पत्नी आणि मुलाला भोसकले)

विशेष म्हणजे या मतदार संघाची संपूर्ण जबाबदारी ही भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे होती आणि त्यांनी इतर विधानसभा लोकसभा मतदार संघातील रणनिती आखताना जिथे जास्त मते घेता येतील त्या स्वत:च्या मतदार संघात दुर्लक्ष केले,असेच दिसून येत आहे. खुद्द शेलार यांच्या मतदार संघात निकम यांना केवळ अडीच ते तीन हजारांचे लिड घेता आले, आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्य झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व विभागांत २८ हजारांचे लिड मिळते हेही अनाकलनीय आहे. त्यामुळे उबाठा शिवसेना आणि मुस्लिम मतांमुळे निकम यांना पराभव पत्कारावा लागला असेच स्पष्ट दिसून येत आहे.

उमेदवारांना झालेले मतदान

वर्षा गायकवाड, काँग्रेस : ४ लाख ४५ हजार ५४५

उज्ज्वल निकम, भाजपा : ४ लाख २९ हजार ०३१

संतोष आंबुरगे, वंचित : ८ हजार २८८

आयुब अमिन हंगुंड, बसपा : ३ हजार २४२

नोटा : ९ हजार ७४९

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.