Maldives President Mohamed Muizzu यांनी सलग तिसऱ्या विजयाबद्दल केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन!

138
Maldives President Mohamed Muizzu यांनी सलग तिसऱ्या विजयाबद्दल केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन!
Maldives President Mohamed Muizzu यांनी सलग तिसऱ्या विजयाबद्दल केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन!

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू (Maldives President Mohamed Muizzu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM Narendra Modi)भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. मालदीवचे राष्ट्रपती पुढे म्हणाले की, “दोन्ही देशांच्या समृद्धीसाठी सामायिक हितसंबंध जोपासण्यासाठी ते पंतप्रधान मोदींसोबत काम करण्यास उत्सुक आहेत.” (Maldives President Mohamed Muizzu)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : उबाठा शिवसेनेच्या तोंडातून काढला वायकर यांनी घास)

मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू (Maldives President Mohamed Muizzu) यांनी X वर एक पोस्ट शेअर केली, “पंतप्रधान @narendramodi, आणि भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाखालील NDA, 2024 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन. मी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.” (Maldives President Mohamed Muizzu)

इतर जागतिक नेत्यांनी देखील पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकारचे लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या विजयाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. नेपाळचे पंतप्रधान प्रचंदा, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) आणि मॉरिशियाचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. (Maldives President Mohamed Muizzu)

(हेही वाचा –Mumbai Rain: मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा; ‘या’ भागांत मुसळधार पावसाच्या सरी)

निकाल आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सलग तिसरे सरकार स्थापन करेल आणि हा ‘सबका साथ सबका विकास’च्या विकसित भारताच्या संकल्पाचा विजय आहे. आणि भारताच्या संविधानावरील लोकांचा दृढ विश्वास आहे. (Maldives President Mohamed Muizzu)

पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पंतप्रधान मोदी म्हणाले की, 1962 नंतर पहिल्यांदाच दोन पूर्ण टर्म पूर्ण करणाऱ्या सरकारला सलग तिसरा कार्यकाळ मिळाला आहे. सहा दशकांनंतर ‘नवा इतिहास’ रचल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्ष एकत्र आले असले तरी त्यांची एकत्रित संख्या भाजपच्या तुलनेत कमी असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. (Maldives President Mohamed Muizzu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.