Lok Sabha Election 2024 : उबाठा शिवसेनेच्या तोंडातून काढला वायकर यांनी घास

316
Lok Sabha Election 2024 : उबाठा शिवसेनेच्या तोंडातून काढला वायकर यांनी घास
Lok Sabha Election 2024 : उबाठा शिवसेनेच्या तोंडातून काढला वायकर यांनी घास
विशेष प्रतिनिधी,मुंबई

उत्तर पश्चिम मतदार लोकसभा मतदार संघातील निवडणूक (Lok Sabha Election 2024) निकाल सर्वांना चटका लावून गेला असून कधी शिवसेनेचे रविंद्र वायकर (Ravindra Waikar) आघाडीवर तर उबाठा शिवसेनेचे अमोल किर्तीकर हे आघाडीवर आणि पिछाडीवर असल्याचे प्रत्येक फेरीगणित पाहायला मिळाले. परंतु शेवटच्या काही फेऱ्या शिल्क असताना अमोल किर्तीकर १८ हजारांहून अधिक मतांनी पुढे असल्याने किर्तीकर यांचा विजय सुकर मानला गेला होता. परंतु शेवटच्या फेऱ्यांमध्ये वायकर यांनी मतांची आघाडी पार करत घासाघीस करत अंतिमत: ४६ मतांनी विजय मिळवला. त्यामुळे वायकर यांचा पराभव जवळपास निश्चितच झाला होता, परंतु वायकर यांनी आपली विजयश्री या पराभवाच्या जबड्यात हात घालून खेचून आणली. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत वायकर हे विजयाला गवसणी घालण्यात यशस्वी ठरले.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्यावतीने रविंद्र वायकर (Ravindra Waikar) आणि उबाठा शिवसेनेच्यावतीने अमोल कीर्तीकर निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी झालेल्या मतमोजणी च्या पहिल्या फेरी पासूनच किर्तीकर हे आघाडीवर होते. किर्तीकर हे पहिल्या फेरीत तब्बल ४०० मतांनी आघाडीवर होते. तर दुसऱ्या फेरीत कीर्तीकर मागे पडले आणि वायकर हे ५१५५ मतांनी पुढे निघून गेले. मात्र त्यानंतर चौथ्या, पाचव्या,सहाव्या फेरी पर्यंत वायकर हे आघाडीवरच होते. त्यानंतर सात ते आठ हजारवमतांचा फरक अमोल कीर्तीकर यांनी पार करत पुन्हा एकदा आघाडी मिळवली. आणि चौदाव्या आणि पंधराव्या फेरीपर्यंत १८ हजार मतांनी पुढे निघून गेले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा तराजू वायकर यांच्या बाजूने झुकले गेला आणि वायकरांनी मतांमधील फरक पार करत पुन्हा एकदा किरकोळ आघाडी घेतली. त्यात ते पुन्हा पुढे निघून गेले. मात्र अटीतटीच्या या लढतीत केवळ २ हजार मतांचा फरक दिसून उमेदवारांच्या प्रतिनिधींनी फेर मतदानाची मागणी केली. त्यात वायकर हे सातशे मतांनी आघाडीवर दिसून आले. पण त्यानंतर यावर पुन्हा आक्षेप नोंदवत फेर मतदानाची मागणी झाल. या फेर मोजणीत वायकर हे ४८ मतांनी आघाडीवर दिसून आले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Results 2024 : निकालाआधीच उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान पदाची स्वप्ने)

या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांना ४,५२,६४४ मते मिळाली, तर अमोल किर्तीकर यांना ४,५२,४९६ मते मिळाली. त्यामुळे फेर मतमोजणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर अखेर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वायकर यांना ४८ मतांनी विजयी घोषित केले. या मतदार संघात दोन वेळा गजानन किर्तीकर हे खासदार होते आणि अमोल हे गजानन किर्तीकर यांचे पुत्र असल्याने मागील दहा वर्षापासून ते वडिलांचे मतदार संघातील कामकाज पहात आले आहेत. विशेष म्हणजे उबाठा शिवसेनेने अमोल किर्तीकर यांची सर्वप्रथम उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे या मतदारसंघात मागील दहा वर्षाच्या अनुभव किर्तीकर यांना असल्याने आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अमोल यांनी मतदार संघ पिंजून काढला होता. त्यांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळाला होता, तसेच कोविड काळातील खिचडी वाटप संदर्भातील गैरकारभार प्रकरणी अमोल यांची ईडी मार्फत चौकशी सुरू असल्याने याची सहानुभूती त्यांना मिळत होती. असेच स्वतः गजानन कीर्तिकर यांनी खिचडी प्रकरणात काहीही नसून केवळ नाहक त्रास दिला जात असल्याचं विधान करत भाजपाच्या कार्यपद्धती विभागात शंका उपस्थित केली होती. यामुळेही याचाही फायदा अमोल किर्तीकर यांना झाला आणि मतदारांनी त्यांच्या बाजूने अधिक मतदान केले. त्या तुलनेत रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांची सर्वात शेवटी उमेदवारी घोषित झाली. मात्र आपल्या मागील ३५ वर्षाच्या राजकीय अनुभवाच्या जोरावर वायकर यांनी अल्पावधीत निवडणुकीची रणनीती आखली. त्यात त्यांना भाजपा सह आपल्या नवीन शिवसेनेचे शिलेदार तसेच मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली. या आपल्या राजकीय अनुभवाच्या जोरावर त्यांनी हा मतदारसंघ पुन्हा बांधण्याचा चंग बांधला ज्यामुळे त्यांना काठावरती यश मिळाले असले तरी पराभवाची धूळ चाखावी लागली नाही याचं समाधान आहे.

(हेही वाचा – Amol Kolhe यांनी पोस्ट केला व्हिडिओ; Ajit Pawar आणि Devendra Fadnavis यांची खिल्ली)

या मतदारसंघात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. मात्र दोन्ही कार्यकर्त्यांच्या हातातील पक्षाचे ध्वज हे मात्र गुंडाळले होते. कुणीही ध्वज फडकावत नव्हते. त्यामुळे जो उमेदवार आघाडी घेत होता, त्या पक्षाच्या झेंडा कार्यकर्ते फडकावत होते. मात्र असे असले तरी नेहमी प्रमाणे दिसणारा उत्साह या त्या ठिकाणी दिसून येत नव्हता. कारण दोन्ही उमेदवार अटीतटीच्या या लढतीत कधी किर्तीकर पुढे तर कधी वायकर पुढे असायचे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही चुरस लागलेली पाहायला मिळत होती. पण त्यांचात तेवढा उत्साह दिसून येत होता नव्हता.(Lok Sabha Election 2024)

यात नोटा ला १५,१६१ मते मिळाली तर वंचितचे परमेश्वर रनशोर यांना १०,०५२ मत मिळाली. ११ अपक्षांनी मिळून सुमारे १२ हजार मत घेतली. त्यामुळे या सर्वांनी घेतली अधिकची मते ही वायकर यांचे मताधिक्य कमी करणारी ठरली आहेत तर किर्तीकर यांचा पराभव करण्यास कारणीभूत ठरली आहेत.मात्र, मनसेने केलेली मदत ही वायकर यांना विजयासाठी महत्वपूर्ण ठरल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे.

(हेही वाचा – Raj Thackeray यांचा पायगुण; ‘त्या’ चार लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विजयी)

उत्तर पश्चिम मतदार संघातील उमेदवारांना मिळालेली मते

शिवसेना रवींद्र वायकर: ४,५२,६४४ मते (विजयी)

उबाठा शिवसेना अमोल किर्तीकर: ४,५२,४९६ मते

नोटा : १५,१६१ मते

वंचित परमेश्वर रनशोर : १०,०५२ मत

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.