Raj Thackeray यांचा पायगुण; ‘त्या’ चार लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विजयी

400
Raj Thackeray यांचा पायगुण; 'त्या' चार लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विजयी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे v यांनी पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग, ठाणे कल्याण, पुणे या भागांमध्ये जाहीर सभा घेतल्या. परंतु राज ठाकरे यांनी जिथे जिथे सभा घेतत्या, त्याठिकाणचे महायुतीचे सर्व उमेदवार विजयी ठरले आहे. त्यामुळे राज ठाकरे हे किंग मेकर ठरले आहेत. (Raj Thackeray)

राज ठाकरे यांनी या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी पहिली जाहीर सभा घेतली होती. या जाहीर सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मतदारांना भावनिक आवाहन करून तुम्हाला मंत्री बनणारा खासदार हवा की संसदेत मागच्या बाकावर बसणारा खासदार हवा असे सांगितले होते. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : काश्मिरी जनतेने फुटीरतावाद्यांना नाकारले; Omar Abdullah, Mehbooba Mufti यांचा पराभव)

त्यानंतर पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभा घेऊन पुण्याच्या विकासाचे मॉडेलच मांडून अशा सुशिक्षित उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले होते. तसेच कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघाचे अनुक्रमे डॉ. श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी संयुक्त जाहीर सभा घेतली होती. (Raj Thackeray)

हे दोन्ही उमेदवार मोठ्या मतांच्या फरकांनी निवडून आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी जिथे जिथे सभा घेतल्या, तिथे तिथे महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला असून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रचार सभा घेतल्याने मनसेचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आणि त्यांनी या निवडणुकीत स्वत:ला झोकून मतदान केल्याने महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा पायगुण या महायुतीच्या या विजयी उमेदवारांना महत्त्वाचा ठरला आहे. (Raj Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.