Lok sabha Election 2024: नक्षलग्रस्त गडचिरोलीत सर्वाधिक टक्के मतदान, तर सर्वात कमी टक्के मतदान कुठे?

103
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्यात ८ जागांवर मतदान; कोणत्या पक्षाचा कुठे आहे बोलबाला?

राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. महाराष्ट्रातील ४८ पैकी ५ मतदारसंघांमध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली. यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. (Lok sabha Election 2024) या पाच मतदारसंघांमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झालं, याची आकडेवारी आता समोर आली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानात ५ लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण ५४.८५ टक्के मतदान झाले. (Lok sabha Election 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संकल्प घेऊन उचलला विडा)

नक्षलग्रस्त मानल्या जाणाऱ्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आज इतर चार मतदारसंघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान झालं आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ६४.९५ टक्के मतदान झालं आहे. पण नागपूर सारख्या लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी टक्के मतदान झालं आहे. नागपूरमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत केवळ ४७.९१ टक्के मतदान पार पडलं आहे. (Lok sabha Election 2024)

(हेही वाचा –Ratnagiri-Sindhudurg : नारायण राणे यांच्या उमेदवारीमुळे राऊतांच्या उरात धडकी, कोकणी जनता यंदा दाखवणार दादांवर विश्वास )

महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान गडचिरोली-चिमूर मतदारसंघानंतर भंडारा-गोंदिया मतदारसंघात झालं आहे. इथे ५६.८७ टक्के मतदान पार पडलं आहे. त्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा नंबर लागतो. इथे ५५.११ टक्के मतदान पार पडलं आहे. यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात ५२.३८ टक्के मतदान पार पडलं. (Lok sabha Election 2024)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.