Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संकल्प घेऊन उचलला विडा

देशाचा अभिमानाचा उत्सव साजरा करताना आपले मित्र, परिवार, नातेवाईक प्रत्येकाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे. सर्वांनी एकत्रितरित्या काम केल्यास मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल असा विश्वास स्वीपचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी व्यक्त केला.

61
Lok Sabha Election 2024 : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संकल्प घेऊन उचलला विडा

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत (Lok Sabha Election) मुंबई उपनगर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार दुतांची भूमिका अतिशय मोलाची आहे. त्यामुळे आपण आपल्या क्षेत्रातील २०० कुटुंबियांशी संपर्क साधून ”घरातून बाहेर पडा आणि २० मे २०२४ रोजी नक्की मतदान करा” असे आवाहन आपण सर्वांनी मतदारांना करावे, असे अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक थविल यांनी यावेळी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

देशाचा अभिमानाचा उत्सव साजरा करताना आपले मित्र, परिवार, नातेवाईक प्रत्येकाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे. सर्वांनी एकत्रितरित्या काम केल्यास मतदानाची टक्केवारी नक्की वाढेल असा विश्वास स्वीपचे मुख्य समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी व्यक्त केला. तसेच, मतदान केंद्राची माहिती सुलभतेने मिळावी यासाठी मतदानाची जी चिठ्ठी असते त्यावर क्युआर कोड दिलेला आहे तो स्कॅन केल्यास मतदानकेंद्राची सर्व माहिती त्यावर मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का)

मतदानाविषयी जनजागृती करण्यात लोकांचा सहभाग  

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) साठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कुर्ला येथील बांटारा भवन येथे आयोजित प्रशिक्षण बालविकास प्रकल्प अधिकारी शरद कुराडे, वैद्यकीय अधिकारी पूजा कुऱ्हाडे, समाज विकास अधिकारी कविता कर्दळे, २९ मुंबई उत्तर पूर्व लोकसभा आणि १७४ कुर्ला विधानसभा मतदारसंघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी आखाडे-फडतरे, अति सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विनायक थविल, अति सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश पाटील, तहसीलदार कांचन जाधव, नायब तहसीलदार अमृता सुतार, ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आणि १७३ चेंबूर विधानसभा मतदारसंघ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश थविल तसेच २९ मुंबई उत्तर पूर्व आणि ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, १७३ चेंबूर आणि १७४ कुर्ला विधानसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्रिय अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी अंगणवाडी, आशा आणि आरोग्य सेविका, महिला बचतगट, सफाई कामगार, विवेकानंद महाविद्यालय चेंबूर येथील राष्ट्रीय छात्र सेवेतील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. (Lok Sabha Election 2024)

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २९ मुंबई उत्तर पूर्व आणि ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, १७३ चेंबूर आणि १७४ कुर्ला विधानसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी, आशा आणि आरोग्य सेविका, महिला बचत गटातील सदस्य, सफाई कामगार, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी यांचा व्हाट्स अॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून जनजागृती करतांना येणाऱ्या अडचणी सोडविणे तसेच वेळोवेळी येणारे अपडेट देणे आणि वरिष्ठांशी समन्वय साधण्यात येणार आहे. या ग्रुपच्या माध्यमातून हजारोंच्या संख्येने क्षेत्रिय अधिकारी, केंद्रस्तरीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी, आशा आणि आरोग्य सेविका, महिला बचत गटातील सदस्य, सफाई कामगार, राष्ट्रीय छात्र सेवेचे विद्यार्थी जोडले जाणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.