Lok Sabha Election 2024 : दिल्लीत तीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान

दिल्लीतील सात जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असतानाच मतदानाची टक्केवारी मात्र अपेक्षेपेक्षा फार कमी आहे.

92
Lok Sabha Election 2024 : दिल्लीत तीन वाजेपर्यंत ४९ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या सहाव्या टप्प्यासाठी शनिवार (२५ मे) रोजी आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ५८ जागांसाठी मतदान होत आहे. सहाव्या टप्प्यात ८८९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या टप्प्यात बिहारच्या आठ, हरियाणाच्या सर्व दहा, झारखंडच्या चार, दिल्लीच्या सर्व सात, ओडिशाच्या सहा, उत्तर प्रदेशच्या १४, पश्चिम बंगालच्या आठ आणि एका जागेवर मतदान होत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. या टप्प्यात एकूण ११.१३ कोटींहून अधिक मतदार ८८९ उमेदवारांचा निर्णय घेतील. (Lok Sabha Election 2024)

दिल्लीतील सात जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असतानाच मतदानाची टक्केवारी मात्र अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. भाजपाच्या बन्सुरी स्वराज आणि कॉंग्रेसचे कन्हैया कुमार यांच्यासह अनेक दिग्गजांच्या भविष्याचा निर्णय शनिवारी होणार आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस भाजपाविरोधात एकत्र लढत आहेत. अशा स्थितीत दिल्लीत यावेळी कल बदलण्याची शक्यता आहे. मात्र, दिल्लीत मतदानाचा वेग मंदावला आहे. (Lok Sabha Election 2024)

सूर्य आग ओकत आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. अशातही काही ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. आठ राज्यांचा विचार केला तर या राज्यांच्या तुलनेत दिल्लीत मतदानाची टक्केवारी कमी आहे. दिल्लीत तीन वाजेपर्यंत ४९.२० टक्के मतदान झाले. तर, १ वाजेपर्यंत ३४.४ टक्के आणि सकाळी ९ वाजेपर्यंत ८.९४ टक्के मतदान झाले होते. यावेळी दिल्लीतील राजकीय समीकरण पाहता सातही जागांवर चुरशीची लढत आहे. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांची आघाडी दिल्लीच्या मैदानात आहे. दिल्लीत आप पक्ष लोकसभेच्या ४ जागांवर तर काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढवत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने यावेळी दिल्लीतून आपल्या ६ खासदारांना तिकीट दिले नसून त्यांच्या जागी नवीन उमेदवार उभे केले आहेत. केवळ विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना भाजपाने ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तिकीट देऊन पुन्हा रिंगणात उतरवले आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident: अग्रवाल बाप-बेट्याच्या तावडीतून ‘असा’ सुटला ड्रायव्हर!)

दुपारपर्यंत देशातील ५८ जागांवर मतदानाच्या वेगाबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत दुपारी १ वाजेपर्यंत ३४.४ टक्के मतदान झाले होते. जर सर्व आठ राज्यांचा विचार केला तर मतदानाचा वेग मंद असल्याचे म्हणावे लागले. पश्चिम बंगालमध्ये मतदारांचा उत्साह सर्वाधिक असल्याचे दिसून आले. येथे दुपारी १ वाजेपर्यंत ५४.८ टक्के मतदान झाले. दुपारी १ वाजेपर्यंत बिहारमध्ये ३६.५ टक्के, हरियाणामध्ये ३४.४, झारखंडमध्ये ४२.५, जम्मू-काश्मीरमध्ये ३५.२, ओडिशामध्ये ३५.७, यूपीमध्ये ३७.२ आणि पश्चिम बंगालमध्ये ५४.८ टक्के मतदान झाले आहे. (Lok Sabha Election 2024)

दिल्लीत सकाळी ११ वाजेपर्यंत २१.७ % मतदान

दिल्लीत सकाळी ११ वाजेपर्यंत दिल्लीत २१.७ टक्के मतदान झाले होते. सर्वाधिक मतदान ईशान्य दिल्लीत (२४.४९ %) आणि सर्वात कमी मतदान चांदनी चौक (१८.५५ %) येथे झाले. ईशान्य दिल्लीतून काँग्रेसचे कन्हैया कुमार आणि भाजपाचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्यात लढत आहे. (Lok Sabha Election 2024)

बन्सुरी स्वराज विरुद्ध सोमनाथ भारती…यांच्यात जोरदार चुरस

राजधानीची नवी दिल्ली सीटही यावेळी चर्चेत आहे. या जागेवरून भाजपाने दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज यांना तिकीट दिले आहे. तर आम आदमी पक्षाने ज्येष्ठ नेते सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे. सोमनाथ भारती हे तीन वेळा दिल्लीचे आमदार राहिले आहेत. बन्सुरी स्वराज आणि सोमनाथ भारती हे दोघेही व्यवसायाने वकील आहेत ही योगायोगाची गोष्ट आहे. (Lok Sabha Election 2024)

कन्हैयाला मैदानात उतरविणे काँग्रेसचा मास्टर स्ट्रोक

ईशान्य दिल्ली लोकसभा सीट कन्हैया कुमारमुळे चर्चेत आली आहे. या जागेवरून भाजपाने पुन्हा मनोज तिवारी यांना उमेदवारी दिली आहे. इंडि अलायन्स अंतर्गत काँग्रेसने कन्हैया कुमारला येथे उमेदवार केले आहे. कन्हैया कुमारने सीपीआय सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मनोज तिवारी यांच्या विरोधात कन्हैया कुमारला मैदानात उतरवून काँग्रेसने मोठा गेम खेळला आहे. यामुळे ईशान्य दिल्लीच्या जागेवरील लढत खूपच रोचक झाली आहे. (Lok Sabha Election 2024)

यावेळी दिल्लीचा कल बदलणार का?

लोकसभेच्या सातही जागा एकाच पक्षाच्या वाट्याला गेल्याचा अनेकवेळा दिल्लीत ट्रेंड आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाने दिल्लीतील सातही जागा जिंकल्या आहेत. याआधी सर्व जागांवर काँग्रेसची सत्ता होती. मात्र यावेळी हा ट्रेंड बदलण्याची शक्यता नाही. आम आदमी पक्ष किंवा काँग्रेसने एकही जागा जिंकली तर हे समीकरणच बदलून जाईल. (Lok Sabha Election 2024)

गांधी परिवार आणि केजरीवाल यांच्याबाबतही हा योगायोग आहे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मतदानासाठी सिव्हिल लाइन्स मतदान केंद्रावर पोहोचले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे अधिकृत निवासस्थान दिल्लीच्या सिव्हिल लाइन्समध्ये आहे जे चांदनी चौक लोकसभा मतदारसंघांतर्गत येते. यावेळी जयप्रकाश अग्रवाल हे चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. (Lok Sabha Election 2024)

याचा अर्थ अरविंद केजरीवाल शनिवारी काँग्रेसला मत देण्यासाठी आले आहेत. आम आदमी पक्षाचे उमेदवार सोमनाथ हे गांधी कुटुंब राहत असलेल्या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भारतीय निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे गांधी कुटुंबाने आम आदमी पक्षाला मतदान केले आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.