Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४०च्या खाली जाईल, तर आम्ही ४०० पार करू, जोरदार हल्लाबोल करत अमित शहा म्हणाले…

यावेळी एका पत्रकाराने इंडि आघाडीला विचारले, तुमचा पंतप्रधान कोण होणार?

109
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४०च्या खाली जाईल, तर आम्ही ४०० पार करू, जोरदार हल्लाबोल करत अमित शहा म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचे ५ टप्पे पूर्ण झाले आहेत. सहाव्या टप्प्यातलं मतदान शनिवार, (२६ मे) रोजी पार पडलं. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. हमीरपूरमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत, तर काँग्रेसच्या तिकिटावर सतपाल रायजादा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, इंडि आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी उमेदवार नाही, असा टोला सभेला संबोधित करणाताना अमित शाह यांनी लगावला.

यावेळी एका पत्रकाराने इंडि आघाडीला विचारले, तुमचा पंतप्रधान कोण होणार? तर त्यांनी उत्तर दिले की, प्रत्येक एका वर्षासाठी एक व्यक्ती होईल. असे कुठे सरकार चालते का? असा सवाल करत १४० कोटी लोकसंख्येचा देश चालवणे सोपे काम नाही, असे अमित शाह म्हणाले.

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ४०च्या खाली जाईल, तर एनडीए ४०० पार करत असल्याचा दावाही अमित शाह यांनी केला.

(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या जयंतीनिमित्ताने २२२२२ नाण्यांच्या सहाय्याने साकारलेल्या शिवरायांच्या प्रतिमेचे रणजित सावरकर यांच्या हस्ते अनावरण)

या निवडणुकीत एकीकडे राहुल बाबा आहेत, जे दर ६ महिन्यांनी सुट्टी साजरी करतात आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत, जे २३ वर्षांपासून दिवाळीतही सीमेवर लष्कराच्या जवानांसोबत मिठाई खात आहेत. देशातील जनतेसमोर दोन्ही प्रकारची उदाहरणे आहेत, असे अमित शाह म्हणाले. तसेच, अयोध्येतील राम मंदिर आणि पाकिस्तानजवळील अणुबॉम्बबाबतच्या वक्तव्यावरून अमित शहा यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राहुल आणि त्यांची बहीण सुट्ट्यांसाठी शिमल्यात येतात, पण रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला हजर राहत नाहीत. हे लोक अयोध्येतील राम मंदिरात जात नाहीत, कारण त्यांना त्यांच्या व्होटबँकेची भीती वाटते, असा टोला अमित शाह यांनी लगावला.

देशभरातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण केली
अमित शाह यांनीही पीओकेबाबत काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. “काँग्रेस नेते आम्हाला पीओकेबद्दल बोलू नका म्हणून घाबरवतात, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. आज मी देवभूमीला सांगतो, आम्ही भाजपावाले अणुबॉम्बला घाबरत नाही. मी हे स्पष्टपणे सांगतो – पीओके भारताचा आहे, राहील आणि आम्ही तो घेऊ.”, असे अमित शाह म्हणाले. याशिवाय, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे कौतुक करताना अमित शाह म्हणाले की, त्यांनी केवळ त्यांच्या क्षेत्राचीच काळजी घेतली नाही, तर देशभरातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.