
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता अद्यापही महिलांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, आता यावर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल असे जाहीर केले आहे, ज्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा-आपल्या भागातील भटक्या श्वानाला रेबीजची लस दिली का ? मग BMC च्या वतीने हाती घेतली लसीकरण मोहिम
राज्यातील 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 1892.61 कोटी रुपये निधी मंजुर निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल. नुकतेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा (Namo Shetkari Yojana) सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे. आता लाडक्या बहिणींना त्यांचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची आस लागली आहे. (Ladki Bahin Yojana)
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणीचा (Ladki Bahin Yojana) हप्ता हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता पहिला आठवडा उलटला तरी महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. परंतु याबाबत, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल, असे सांगितले आहे. (Ladki Bahin Yojana)
हेही वाचा- Nepal Protests : बेरोजगारी, घराणेशाही, घोटाळे…; नेपाळमधील निदर्शनांच्या मागे काय आहेत कारणे ?
लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकर ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. असेही आदिती तटकरे यांनी म्हटले. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता म्हणजेच 3000 रुपये एकत्र येणार का? असाही प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Ladki Bahin Yojana)
हेही पहा-
https://www.youtube.com/watch?v=P8CqTd2Ojds
Join Our WhatsApp Community
