Khalistani : कॅनडात खलिस्तानी दहशतवाद्यांनी फुटबॉलला तिरंगा गुंडाळून लाथाडला; व्हिडीओ व्हायरल

कॅनडातील २०२१च्या जनगणनेनुसार तिथे शिखांची लोकसंख्या ७ लाख ७० हजार एवढी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर खलिस्तान्यांना खुश करण्यासाठी जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर बिनबुडाचा आरोप केला आहे.

89

राजकीय अस्तित्व रसातळाला जात असल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर बिनबुडाचे आरोप केले. पुढच्या वर्षी या देशात निवडणूक होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मतांचे राजकारण करण्यासाठी ट्रुडो यांनी तेथील खलिस्तान्यांची (Khalistani)  पाठराखण करायला सुरुवात केली आहे. गुजराती नागरिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, आता दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारताच्या तिरंग्याची अवमान करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अत्यंत संतापजनक आहे.

या व्हिडिओमध्ये खलिस्तानी (Khalistani) दहशतवाद्यांनी खांद्यावर खलिस्तानींचा झेंडा घेऊन भारतविरोधी घोषणा केली. तसेच फुटबॉलला तिरंगा गुंडाळला आणि तो खलिस्तानी दहशतवादी लाथाडत आहेत. हा व्हिडीओ अत्यंत संतापजनक आहे. सोशल मीडियातून यावर जोरदार टीका होत आहे. याव्हिडिओची भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घ्यावी. सरकारने या खलिस्तानी समर्थकांचा पासपोर्ट रद्द करावा. ज्यामुळे जे जगात भटकतील. जेणेकरून ते भारतात कधीच परतू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

(हेही वाचा Khalistani : कॅनडात खलिस्तान्यांकडून गुजराती भाषिकांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ व्हायरल)

कॅनडातील २०२१च्या जनगणनेनुसार तिथे शिखांची लोकसंख्या ७ लाख ७० हजार एवढी आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर खलिस्तान्यांना (Khalistani) खुश करण्यासाठी जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर बिनबुडाचा आरोप केला आहे. पण ट्रुडो यांच्या दुर्दैवाने त्यांचा डाव फसला. त्यांच्या आरोपावर पाश्चिमात्य देशांची कवडीचीही किंमत दिली नाही. खुद्द अमेरिकाने या आरोपावर कॅनडाकडे पुरावे मागितले. कॅनडाने जी ७ देशांकडेही हा विषय नेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यात यश आले नाही. आता आशिया खंडातील श्रीलंका आणि बांग्लादेशानेही भारताची बाजू घेतली आहे. अशा प्रकारे कॅनडा या विषयावर जगाच्या नकाशावर एकटा पडला आहे. मात्र तरीही जस्टिन ट्रुडो हे खलिस्तान्यांना भारताचा द्वेष करण्यासाठी तेथील भूमीचा वापर करण्यासाठी मोकळीक देत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.