Kamal Nath : काँग्रेसला अजून एक धक्का; कमलनाथ भाजपात प्रवेश करणार ?

दरम्यान माजी आमदार दिनेश अहिरवार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कटारे यांनी १२ फेब्रुवारी रोजी भाजपात प्रवेश केला.

211
Kamal Nath : काँग्रेसला अजून एक धक्का; कमलनाथ भाजपात प्रवेश करणार ?

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का बसला होता. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता मध्यप्रदेशमध्येही काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamal Nath) भाजपच्या वाटेवर असल्याचे समोर येत आहे. कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांनी एक्स (ट्विटर)वरुन काँग्रेस पक्षाचं नाव काढून टाकलं आहे. त्यामुळे या चर्चेला अधिक महत्व आले आहे.

New Project 2024 02 17T143231.731

(हेही वाचा – Shirur : महायुतीमध्ये शिरूर लोकसभेवरून रस्सीखेच…शिरुर लोकसभेच्या जागेवर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा)

कोणता नेता समजहितासाठी आमच्यासोबत येत असेल तर त्यांचं स्वागत आहे – प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा

मध्य प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा (VD Sharma) यांनी कमलनाथ (Kamal Nath) यांच्या भाजप पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, जर मध्यप्रदेशमधील कोणता नेता समजहितासाठी आमच्यासोबत येत असेल तर त्यांचं स्वागत आहे. कमलनाथ यांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे.

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी लावली)

जर कमलनाथांच्या हृदयात वेदना असतील तर…

विडी शर्मा पुढे म्हणाले की, असे काही लोक असतात जे नाराज असतात आणि त्यांना पुढे जाण्याची संधी मिळालीच पाहिजे. शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) भोपाळ येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना शर्मा म्हणाले की, ज्यांचे नाव तुम्ही घेत आहात, जर त्यांच्या मनात वेदना (Kamal Nath) असतील तर त्यांचेही स्वागत आहे.

(हेही वाचा – Asian Badminton Championship : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुषांचा जपानकडून पराभव)

दरम्यान माजी आमदार दिनेश अहिरवार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश कटारे यांनी १२ फेब्रुवारी रोजी भाजपात प्रवेश केला.(Kamal Nath)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.