BJP : जेपी नड्डा घेणार भाजप पक्ष पदाधिकारी, लोकप्रतीनिधींची ‘शाळा’

जे.पी. नड्डा सर्वांची शाळा घेणार असून लवकरच महाराष्ट्रात संघटनात्मक बदल देखील करणार असल्याचे खात्रीालायक सुत्रांकडून समजते.

97

भाजप प्रदेश कार्यकारिणीची येत्या गुरुवारी, 18 मे रोजी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. बैठकीनंतर सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत. यात जे.पी. नड्डा सर्वांची शाळा घेणार असून लवकरच महाराष्ट्रात संघटनात्मक बदल देखील करणार असल्याचे खात्रीालायक सुत्रांकडून समजते.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. याच वर्षी महाराष्ट्रात काही महत्वपूर्ण महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याचा सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवाच केला होता. याच पार्श्वभूमीवर नड्डा यांचा हा दोन दिवसीय दौरा फार महत्वाचा आहे. या बैठकीसाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात येणार आहेत.

(हेही वाचा Shri Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मुख्य प्रवेशद्वाराचं हिंदू महासंघ करणार शुद्धीकरण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.