देशात ‘या’ राज्यांत सुरु होणार 5G इंटरनेट सेवा

121
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी, ८ मार्च रोजी १३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आणखी २७ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली. यासह जिओने आतापर्यंत देशातील ३३१ शहरांमध्ये 5G सेवांचा विस्तार केला आहे. यासंदर्भात कंपनीने एका निवेदनाद्वारे माहिती दिली.
आता आंध्र प्रदेश, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल, यासारख्या राज्यांमधील २७ शहरांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या निवेदनानुसार, ८ मार्च २०२३ पासून या २७ शहरांमध्ये जिओ वापरकर्त्यांना वेलकम ऑफर दिली जाईल. या अंतर्गत, कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1 जीबीपीएसपर्यंतच्या वेगाने अमर्यादित डेटा मिळू शकतो. दरम्यान, यापूर्वी  कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी घोषणा केली होती की, २०२३ च्या अखेरीस जिओची 5G सेवा देशभरात पसरेल. 5G नेटवर्क भारतात दोन प्रकारे काम करते. यामध्ये जिओ स्टँड अलोन 5G नेटवर्कवर काम करते, तर एअरटेल नॉन स्टँड अलोन नेटवर्कवर काम करते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.