छगन भुजबळ नाराज आहेत का? काय म्हणतात Shambhuraj Desai…

100
छगन भुजबळ नाराज आहेत का? काय म्हणतात Shambhuraj Desai…

नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली होती. उमेदवारीसाठी नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांचं (Chhagan Bhujbal) नाव चर्चेत होतं. मात्र, त्यानंतर त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामध्ये हेमंत गोडसेंचा पराभव झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचं नाव चर्चेत होतं. या सर्व चर्चांवर उत्पादन शुक्ल मंत्री तथा शिवसेनेचे पाटण विधानसभेचे आमदार शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मात्र भुजबळ नाराज आहेत असे वाटत नाही. तर छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या मुद्द्यावर केवळ खंत व्यक्त केली. असे विधान देसाई यांनी केले. (Shambhuraj Desai)

(हेही वाचा – BJP : अधिवेशनापूर्वी भाजपात व्यापक फेरबदल)

भुजबळ नाराज आहेत का? 

शंभुराज देसाई म्हणतात, भुजबळ नाराज असल्याचे मला कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. त्यांनी केवळ खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, मी लोकसभेला इच्छुक होतो. पण त्यावेळी संधी मिळाली नाही. त्यामुळे मी थांबलो. ते असे म्हणाले असले तरी ते नाराज असल्याचे वाटत नाही. नाशिकच्या जागेवर आमचा विद्यमान खासदार होता. त्यामुळे आम्ही त्या जागेवर लढलो. त्यात भुजबळांवर अन्याय होण्याचा प्रश्नच येत नाही, असे देसाई एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. (Shambhuraj Desai)

(हेही वाचा – पुणेकरांनो सावधान! फेक कॉल्सवर विश्वास ठेवू नका; MNGL चे आवाहन)

शिंदेंनी भुजबळांना विरोध केला नाही

नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा हक्क होता. भुजबळांनी मध्यंतरी वरिष्ठ पातळीवर काही वेगळी चर्चा झाल्याचा दावा केला असेल, पण आम्हाला त्याची कोणतीही कल्पना नाही. आम्ही जागावाटपाला सुरुवात केली तेव्हाच ठरले होते की, ज्या पक्षाचे जे खासदार आहेत, त्या पक्षाला तेथील उमेदवारी दिली जाईल. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या जागेवर भुजबळांना उमेदवारी देण्यासाठी विरोध केल्याच्या आरोपात तथ्य नाही, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. (Shambhuraj Desai)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.