बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा; Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश

77
बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा; Dr. Neelam Gorhe यांचे निर्देश

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करण्यासोबत शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासोबत पाल्य आणि पालकांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा, तसेच वाहतूक नियोजन आणि रस्ता सुरक्षेबाबतही आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) यांनी दिले. पुण्यात अलिकडे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, बालगुन्हेगारी आणि ससून रुग्णालयातील व्यवस्थापनाबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. (Dr. Neelam Gorhe)

डॉ. गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe) म्हणाल्या, बाल न्याय कायद्यानुसार गंभीर गुन्ह्याबाबत कारवाई करतांना गुन्हेगारांना प्रौढ समजण्यात यावे यादृष्टीने नियमांचा अभ्यास करून कार्यप्रणाली निश्चित करण्याचा प्रयत्न करावा. जिल्हाधिकाऱ्यांकडे होणाऱ्या बाल कल्याण समितीच्या बैठकांमधील कामकाज गांभिर्याने होईल याकडे लक्ष द्यावे. बाल गुन्हेगारी रोखण्यासोबत गंभीर गुन्ह्यात शिक्षा होईल यादृष्टीने कार्यवाही करण्यावर भर द्यावा. महानगरपालिकेने शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याची मोहिम राबवावी, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. पोलीस विभाग गुन्हे शोधण्यासाठी उपयोग करीत असलेल्या सीसीटीएनएस प्रणाली बाल गुन्हेगारांसाठी लागू करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात येईल. (Dr. Neelam Gorhe)

(हेही वाचा – BJP : अधिवेशनापूर्वी भाजपात व्यापक फेरबदल)

शहरातील ब्लॅकस्पॉटची माहिती संकलीत करून अशा ठिकाणी सीसीटीव्ही लावल्यास वाहतूकीवर चांगल्याप्रकारे नियंत्रण करता येईल. विविध सण आणि उत्सवाच्या कालावधीत वाहतूक नियंत्रणाबाबत आतापासून नियोजन करावे. शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल महानगरपालिकेने सादर करावा. महानगरपालिका आणि पोलीस विभागाने अपघात रोखण्यासाठी संयुक्त मोहिम राबवावी. ससून रुग्णालयाने नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यावर भर द्यावा. आरोग्य सेवेत ससून रुग्णालयाचा लौकिक चांगला असून तो वाढविण्याचा प्रयत्न करावा. आरोग्य क्षेत्रातील चांगल्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींची मदत घेवून कामकाजात पारदर्शकता वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले. (Dr. Neelam Gorhe)

मद्यसेवनासाठी परवाना देण्यासाठी भरावयाचे शुल्क वाढविण्याबाबत आणि एक दिवसाचा परवाना देतांना मुले अल्पवयीन आहेत का याची काटेकोर नियमावली करणे शक्य आहे का याचा विचार करावा. मद्य विक्री आणि परवान्याचा वापर याचा ताळमेळ घेण्याची व्यवस्था निर्माण करता येईल का याचा विचार करावा. अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, असे निर्देशही डॉ. गोऱ्हे यांनी दिले. (Dr. Neelam Gorhe)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.