Iran War News : इराणचा अमेरिकन अधिकाऱ्यांशी हस्तांदोलनाला नकार, चर्चेत नेमकं काय सुरू आहे

Iran War News : इराणचा अमेरिकन अधिकाऱ्यांशी हस्तांदोलनाला नकार, चर्चेत नेमकं काय सुरू आहे

96
Iran War News : इराणचा अमेरिकन अधिकाऱ्यांशी हस्तांदोलनाला नकार, चर्चेत नेमकं काय सुरू आहे
Iran War News : इराणचा अमेरिकन अधिकाऱ्यांशी हस्तांदोलनाला नकार, चर्चेत नेमकं काय सुरू आहे
  • ऋजुता लुकतुके

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चांदरम्यान एक अनपेक्षित राजनैतिक प्रसंग घडला असून त्याची जगभर चर्चा सुरू झाली आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या बैठकीपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक छायाचित्र सत्रात इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत हस्तांदोलन किंवा फोटोसेशन टाळत सभागृहातून बाहेर पडल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे.(Iran War News)

समोर आलेल्या व्हिडीओनुसार, अराघची सभागृहात आले, उपस्थित नेत्यांना अभिवादन केले आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतल्यानंतर ते त्वरित निघून गेले. त्या वेळी व्हान्स उपस्थित होते, मात्र दोघांमध्ये कोणताही सार्वजनिक संवाद किंवा हस्तांदोलन झाले नाही. यानंतर इराणी सरकारी माध्यमांनी याला अमेरिकेला दिलेला राजनैतिक संदेश म्हणून रंगवण्याचा प्रयत्न केला.(Iran War News)

मात्र अमेरिकन अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, इराणी प्रतिनिधींनी सुरुवातीला संयुक्त पत्रकार परिषद आणि फोटोसेशनसाठी सहमती दर्शवली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यासाठी स्वतःची सरकारी माध्यमांची टीमही सोबत आणली होती. मात्र कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमे उपस्थित असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी सहभाग न घेण्याचा निर्णय घेतला.(Iran War News)

(हेही वाचा – Monsoon ची दमदार एन्ट्री! मुंबईसह राज्याला पावसाचा विळखा; पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा )

या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. अनेकांनी याला अमेरिकेचा अपमान मानले, तर काहींनी इराणची ही भूमिका केवळ देशांतर्गत राजकारणासाठी असल्याचे म्हटले. विशेष म्हणजे कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनीही काही नेत्यांना अभिवादन केले, मात्र व्हान्स यांच्याशी सार्वजनिकरित्या संवाद साधला नाही. त्यावरूनही विविध तर्कवितर्क लावले गेले. मात्र अमेरिकन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, व्हान्स आणि कतारी नेतृत्वामध्ये यापूर्वी अनेक तास चर्चा झालेली होती, त्यामुळे स्वतंत्र अभिवादनाची गरज नव्हती.(Iran War News)

दरम्यान, या घटनेमागे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील कठोर इशाऱ्यांचा प्रभाव होता का, याबाबतही चर्चा सुरू आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या पूर्वीच्या चर्चांपूर्वी व्हान्स यांनी इराणने अमेरिकेला “खेळवण्याचा” प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा दिला होता. तसेच अण्वस्त्र कार्यक्रम आणि होर्मुझ सामुद्रधुनीबाबत अमेरिकेची भूमिका कठोर राहणार असल्याचे सांगितले होते.(Iran War News)

इराणी माध्यमांनी आणखी एक दावा करत शिष्टमंडळाने चर्चेच्या सुमारे ८० मिनिटांनंतर बैठक सोडल्याचे म्हटले. मात्र अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी हा दावा नाकारला असून दोन्ही बाजूंमध्ये रात्री उशिरापर्यंत अणुकार्यक्रम, होर्मुझ सामुद्रधुनी आणि शांतता कराराच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे सांगितले.(Iran War News)

एकूणच, शांतता चर्चांमध्ये प्रगतीचे संकेत मिळत असतानाच या फोटोसेशन वादामुळे अमेरिका-इराण संबंधांमधील अविश्वास अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील वाटाघाटींमध्ये दोन्ही देश हे मतभेद कितपत दूर करतात, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.(Iran War News)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.