I.N.D.I.A Alliance : इंडिया बैठक : बाहेर कीर्तन आत तमाशा

मात्र, अंतर्गत कलहामुळे लवकरच विरोधी आघाडी पोखरली जाणार असल्याचे कळतंय.

129
I.N.D.I.A Alliance : इंडिया बैठक : बाहेर कीर्तन आत तमाशा
I.N.D.I.A Alliance : इंडिया बैठक : बाहेर कीर्तन आत तमाशा
  • वंदना बर्वे

केंद्र सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी देशातील काही विरोधी पक्षांनी मिळून इंडिया आघाडी तयार केली आहे. या आघाडीमध्ये सर्वच आलबेल असल्याचे वारंवार सांगितलं जातंय. मात्र, अंतर्गत कलहामुळे लवकरच विरोधी आघाडी पोखरली जाणार असल्याचे कळतंय. प्राप्त माहितीनुसार अगदी लोगो जाहीर करण्यापासून तर संयोजक निवडण्यापर्यंत आपसात मतभेद असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळेच विरोधी पक्षांची इंडिया आघाडी म्हणजे बाहेर कीर्तन आतून तमाशा असल्याचे सांगितलं जातेय.

इंडियन नॅशनल डेव्हलमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स (I.N.D.I.A) या विरोधी आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत समन्वय आणि प्रचारासह ५ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी तिसऱ्या बैठकीत लोगो अंतिम करण्यात आला नाही. अनेक पक्षांना एक डिझाईन आवडले आहे. त्यात सुधारणेसाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. तर डाव्या पक्षांनी लोगो ला विरोध केला असल्याचे समजतंय. तर कोलकत्ताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा लोगोला पाठिंबा असल्याची माहिती समजली आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav : मुंबईत बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकांमुळे शनिवार-रविवार गर्दीने रस्ते गजबजणार)

तर संयोजकाचे नाव यासाठी जाहीर करण्यात आले नाही कारण लोकामध्ये कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये. जेणेकरून संयोजकालाच देशातील जनता पंतप्रधान पदाचा उमेदवार समजेल. या भीतीपोटीच संयोजकाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही, असेही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, इंडियन नॅशनल डेव्हलमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स (I.N.D.I.A) या विरोधी आघाडीची चौथी बैठक दिल्लीत होणार आहे. सुप्रिया सुळे (खासदार, शरद पवार गट) यांनी मुंबईत १ सप्टेंबर रोजी झालेल्या तिसऱ्या बैठकीनंतर ही माहिती दिली. या तिसऱ्या बैठकीत आता जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा होणार असल्याचेही सांगण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.