प्रशस्त बंगले सेना-भाजपातील संभाव्य मंत्र्यांसाठी राखीव? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रालयासमोरील निवासस्थाने

98
प्रशस्त बंगले सेना-भाजपातील संभाव्य मंत्र्यांसाठी राखीव? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रालयासमोरील निवासस्थाने
प्रशस्त बंगले सेना-भाजपातील संभाव्य मंत्र्यांसाठी राखीव? राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रालयासमोरील निवासस्थाने

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेना-भाजपामधले इच्छुक बघ्याच्या भूमिकेत आणि राष्ट्रवादीचे ९ आमदार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताना दिसले. त्यामुळे नाराज झालेल्या सेनेच्या आमदारांनी माध्यमांसमोर आपला रोष व्यक्त केला. ही बाब ध्यान्यात घेऊन आमदारांमधील नाराजी दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मलबार हिलमधील बंगले न देता, हे प्रशस्त बंगले सेना-भाजपातील संभाव्य मंत्र्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

मंगळावारी ११ जुलै रोजी नव्या मंत्र्यांना शासकीय बंगले आणि मंत्रालयातील दालनांचे वाटप करण्यात आले. त्यानुसार, छगन भुजबळ यांना सिद्धगड, हसन मुश्रीफ विशालगड, वळसे-पाटील सुवर्णगड, धनंजय मुंडे यांना प्रचितगड बंगला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मलबार हिलमधील प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त बंगल्यांसाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आग्रही होते. मात्र त्यांचा हा प्रस्ताव नाकारत ७ मंत्र्यांना मंत्रालयासमोरील बंगले देण्यात आले आहेत. अदिती तटकरे या सरकारमधील एकमेव महिला मंत्री असल्याने त्यांना मलबार हिलमधील बंगला दिला जाईल, असे कळते. मात्र, अद्याप हा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना विहित कार्यकाळासाठी शासकीय बंगला दिला जातो. मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान म्हणून वर्षा बंगला राखीव ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे. मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना मलबार हिलमधील बंगले, तर अन्य मंत्र्यांना मंत्रालयासमोरची निवासस्थाने दिली जातात. मलबार हिलमधील बहुतांश बंगले हे समुद्र किनाऱ्याला लागून असून, आकाराने मोठे आहेत. शिवाय त्यांची रचनाही प्रशस्त अशी आहे. याऊलट मंत्रालयासमोरचे बंगले तुलनेने लहान असल्याने मलबाल हिलमध्ये बंगला मिळवा, यासाठी सर्वच मंत्री प्रयत्नशील असतात.

(हेही वाचा – Muslim : झारखंडपाठोपाठ आता कर्नाटक विधानसभेत नमाजासाठी स्वतंत्र खोलीची मागणी)

कोणाला कुठला बंगला?

छगन भुजबळ – सिद्धगड (ब-६)
हसन मुश्रीफ – विशालगड (क-८)
दिलीप वळसे-पाटील – सुवर्णगड (क-१)
धनंजय मुंडे – प्रचितगड (क-६)
धर्मरावबाबा आत्राम – सुरुचि-३
अनिल पाटील – सुरुचि-८
संजय बनसोडे – सुरुचि – १८

राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रालयात कुठे बसणार?

१) छगन भुजबळ – मंत्रालय मुख्य इमारत, २ रा मजला, दालन क्र. २०१ दक्षिण बाजू

२) हसन मुश्रीफ – मंत्रालय विस्तार इमारत, ४ था मजला, दालन क्र. ४०७

३) दिलीप वळसे-पाटील – मंत्रालय मुख्य इमारत, ३ रा मजला, दालन क्र. ३०३, उत्तर बाजू

४) धनजंय मुंडे – मंत्रालय विस्तार इमारत २ रा मजला, दालन क्र. २०१ ते २०४, २१२

५) धर्मरावबाबा आत्राम – मंत्रालय विस्तार इमारत, ६ वा मजला, दालन क्र. ६०१, ६०२ व ६०४

६) आदिती तटकरे – मंत्रालय मुख्य इमारत, १ ला मजला, दालन क्र. १०३. उत्तर बाजू

७) अनिल पाटील- मंत्रालय मुख्य इमारत, ४ था मजला, दालन क्र. ४०१, दक्षिण बाजू

८) संजय बनसोडे – मंत्रालय मुख्य इमारत, ३ रा मजला, दालन क्र.३०१, दक्षिण बाजू

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.