पाकिस्तानला द्विपक्षीय मुद्द्यांवर भारताचे सहकार्य हवे असेल, तर त्यांनी आधी स्वतः निर्माण केलेला दहशतवादी पायाभूत ढाचा नष्ट केला पाहिजे, असा ठाम इशारा अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी दिला आहे. सिंधू पाणी करार स्थगित ठेवण्याच्या भारताच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने आयोजित केलेल्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर एका लेखाद्वारे त्यांनी पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे.(India Envoy Warns Pakistan)
‘न्यूजवीक’ या अमेरिकन मासिकात लिहिलेल्या लेखातून विनय मोहन क्वात्रा यांनी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांवर जोरदार टीका केली. क्वात्रा यांनी सिंधू जलवाटप करारावर सविस्तर भाष्य केलंय. भारताने पाकिस्तानसोबत मैत्री आणि सद्भावनेच्या उद्देशाने हा करार केला होता. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानच्या आचरणात कोणताही बदल झालेला नाही, असं मत क्वात्रा यांनी व्यक्त केलंय.(India Envoy Warns Pakistan)
सिंधू जलवाटप कराराबाबतच्या मागण्या पूर्ण न झाल्यास भारतावर युद्धाची धमकी देण्याच्या भूमिकेचा क्वात्रा यांनी समाचार घेतला. त्यांनी म्हटलंय की, “आपल्या अंतर्गत समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी भारताला युद्धाची धमकी देणं हा इस्लामाबादचा नेहमीचाच मार्ग बनला आहे. पाकिस्तानने परिषदा भरवून भारतावर आरोप करण्यापेक्षा आणि धमक्या देण्यापेक्षा स्वतःची खालावलेली पाण्याची व्यवस्थापन स्थिती सुधारावी. प्रत्येक अंतर्गत अपयशाचं खापर भारतावर फोडण्याची पाकिस्तानची सवय आता जुनी झाली आहे”, असे त्यांनी म्हटले आहे(India Envoy Warns Pakistan)
भारताची भूमिका पुन्हा स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “जर पाकिस्तानला द्विपक्षीय मुद्द्यांवर भारताचे सहकार्य हवे असेल, तर सर्वप्रथम त्याने गेल्या अनेक वर्षांत उभारलेला दहशतवादाचा पायाभूत ढाचा पूर्णपणे नष्ट केला पाहिजे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या अर्थपूर्ण द्विपक्षीय चर्चेला वाव नाही”, असा भारताचा स्पष्ट संदेश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.(India Envoy Warns Pakistan)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community


