Hafiz Saeed : भारताने पाककडे मागितला हाफिज सईदच ताबा; पाकिस्तानने का दिला नकार? 

183

मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद (Hafiz Saeed)हा सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. त्याचा ताबा भारताला देण्यात यावा, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. मात्र पाकिस्तानने ही मागणी फेटाळून लावली आहे.

हाफिज सईदला भारताकडे हस्तांतरित करण्यात यावे अशी विनंती भारताने पाकिस्तानकडे केली आहे. त्यासाठी भारताने आवश्यक सर्व कागदपत्रे पाकिस्तानकडे पाठवली आहेत. मुंबई २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हा हाफीज सईद (Hafiz Saeed) आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यात हात असल्याचे उघड झाले आहे. या संघटनेचा म्होरक्या सईद हाफीज हा आहे. यानंतर कट्टर मौलवी असलेल्या हाफीज सईदला सन २०१९ मध्ये पाकिस्तानच्या काऊंटर टेररिझम डिपार्टमेंटनं (CTD) अटक केली होती.

(हेही वाचा PM Narendra Modi : अयोध्या दौऱ्यावर असताना PM Narendra Modi म्हणाले, अयोध्या धामच्या विकासकामांचा अभिमान)

काय म्हणाले पाकिस्तान? 

भारताच्या विनंतीला उत्तर देताना पाकिस्तानच्या फॉरेन ऑफिसचे प्रवक्ते मुमताज झहरा बलोच यांनी सांगितले की, हाफीज सईदला भारताकडे सुपूर्द करण्याची विनंती करणारा भारताचा अर्ज पाकिस्तानला प्राप्त झाला आहे. तथाकथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्याचं प्रत्यार्पण करावे अशी विनंती भारताने यात केली आहे. परंतु भारत आणि पाकिस्तान यांमध्ये परस्पर प्रत्यार्पण कायदा अस्तित्वात नसल्याने पाकिस्तानकडून हाफीज सईदला भारताकडे प्रत्यार्पणाच्या स्वरुपात सुपूर्द केले जाऊ शकत नाही, असे अधिकारी यांनी स्पष्ट केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.