Palghar Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात, दोन चिमुकल्यांचा मृत्यू, १५ जण जखमी

पालघर येथील मनोर विक्रमगड रोडवर बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ते १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत.

194
Palghar Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात, दोन चिमुकल्यांचा मृत्यू, १५ जण जखमी

पालघर येथील मनोर (Manor) विक्रमगड रोडवर बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ते १० ते १५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Palghar Accident)

पालघरच्या मनोर विक्रमगड रोडवर शनिवारी (३०डिसेंबर) बस आणि डंपर मध्ये भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसमधील दोन चिमूकल्यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात १५-२० प्रवाशी गंभीर जखमी झाले. (Palghar Accident)

(हेही वाचा : Mangaon Accident : ताम्हिणी घाटात खाजगी बसचा भीषण अपघात; ५५ जण जखमी, दोघांचा मृत्यू)

हा अपघात झाल्याचे कळताच घटनास्थळी खासदार राजेंद्र गावीतही उपस्थित होते. यापैकी काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातात जखमी झालेल्यांपैकी काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एसटी बसचा चक्काचूर झाला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.