Smriti Irani : ‘गांधी कुटुंबात हिंमत असेल तर…’; स्मृती इराणींचा विरोधकांवर जोरदार पलटवार

राहुल गांधींनी मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा घेऊन भाजपवर जोरदार टीका केली.

119
Lok Sabha Election 2024 : रायबरेलीमधून गांधींना हद्दपार करणार, स्मृती इराणींना विश्वास

खासदारकी मिळाल्यानंतर अनेक दिवसांनी राहुल गांधी आज म्हणजेच बुधवार, ९ ऑगस्ट रोजी संसदेत (Smriti Irani) बोलत होते. राहुल गांधी बोलत असताना प्रंचड गोंधळ झाल्याचा पाहायला मिळाला. यावेळी राहुल गांधींनी मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा घेऊन भाजपवर जोरदार टीका केली. टीका करतांना मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली असल्याचं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या स्मृती इराणी?

“पहिल्यांदाच भारत मातेच्या हत्येची चर्चा झाली आणि काँग्रेस पक्ष इथे टाळ्या वाजवत राहिला. भारताच्या मरण्याच्या मुद्द्यावर विरोधी सदस्यांनी टाळ्या वाजवल्या. आज येथे एक भारतीय असल्याने मी म्हणते की मणिपूरचे तुकडे झालेले नाहीत, मणिपूर विभागलेला नाही, तो माझ्या देशाचा एक भाग आहे. मी त्यांना विचारते, त्यांच्या आघाडीचा एक सदस्य इथे बसला आहे, जो तामिळनाडूत म्हणतो की भारत म्हणजे फक्त उत्तर भारत. भारत फक्त उत्तर भारत आहे का, तुमच्यात हिम्मत असेल तर तुमच्या सहकाऱ्याला चोख प्रत्युत्तर द्या. तसेच काँग्रेसच्या नेत्याने काश्मिरमध्ये जनमत चाचणी घेण्याचे वक्तव्य केलं होतं. जम्मू-काश्मिरला भारतापासून वेगळे करण्याचे वक्तव्य करणारा नेता काँग्रेसमध्ये का आहे. गांधी कुटुंबात हिंमत असेल तर त्यांनी याचे खंडन करुन दाखवावे”, असं स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या.

(हेही वाचा – व्हिएतनाम बरोबर स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी भारताने चर्चा केली सुरू)

स्मृती इराणी (Smriti Irani) जेव्हा बोलत होत्या, तेव्हा राहुल गांधी यांनी सभागृह सोडल्याचं पाहायला मिळालं. तसेच इराणी यांच्या भाषणावेळी काँग्रेस नेत्यांनी ‘इंडिया-इंडिया’च्या घोषणा देखील दिल्या. लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांच्या सुचनेनंतरही काँग्रेस नेत्यांनी घोषणा सुरुच ठेवल्या. विरोधकांच्या घोषणांनी चिडलेल्या स्मृती इराणी यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला.

यावेळी स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी देशातील इतर राज्यात होत असलेल्या अत्याचारांचा पाढा देखील वाचून दाखवला. काश्मिरमध्ये अनेक महिलांवर बलात्कार झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच काँग्रेसच्या काळातील अत्याचारावर तुम्ही का बोलत नाही, असा थेट सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.